Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 ऑक्टोबर 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. सणासुदीच्या तोंडावर महागाईत मोठी घट, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर, गेल्या पाच महिन्यातील सर्वात कमी महागाई दराची नोंद, खाद्य पदार्थांच्या महागाई दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्याचा परिणाम एकूण महागाई दरावर, तसेच औद्योगिक विकास दरात वाढ झाली असून तो 11.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
2. यंदाच्या मोसमातील मान्सूनचा विदर्भ आणि मराठवाड्यातील पट्ट्याला निरोप, दोन दिवसांत उर्वरित महाराष्ट्रातूनही परतणार, मात्र परतताना कोकणाला झोडपणार
3. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविद्यालयासंबंधी निर्णय होण्याची शक्यता, पदोन्नतीतील भटक्या विमुक्त जातींचं आरक्षण आणि ओबीसीचा मुद्दा गाजण्याचीही चिन्ह
4. 22 ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, राज्य सरकारचा निर्णय, तर दुकानांसह रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
5. रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान आज 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा करणार, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 16 मंत्रालयाची मोट बांधणार, यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील तसेच ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन
6. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंच्या अडचणीत वाढ, मुंबई सत्र न्यायालयानं मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
7. 10 दिवस कोठडीत मुक्कामी असणाऱ्या आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी, निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
8. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार, राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला 231 कोटी 30 लाख रूपयांचा निधी जाहीर
9. वर्ल्ड कपमध्ये मेंटरशिपसाठी महेंद्र सिंह धोनी कोणतेही पैसे घेणार नाही, देशासाठी काम करण्याची धोनीची इच्छा, तर बीसीसीआयकडूनही स्वागत
10. आज आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना, दिल्ली विरुद्ध कोलकाता भिडणार