(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जून 2021 गुरुवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जून 2021 गुरुवार | ABP Majha
1. राज्यात बुधवारी कोरोनाच्या 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त
2. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर
3. मुंबई आणि कोकणात 13 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात एनडीआरएफची पथकं तैनात
4. गोवा हायवेवरील वशिष्ठी नदीवरचा पूल आज रात्री साडे दहा ते पहाटे पाचपर्यंत बंद, बीडमध्ये पूल वाहून गेला
5. औरंगाबादमध्ये पानवडी नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यात यश, तर पालघरमध्ये अपूर्ण रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक उलटला
6. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून वादंग, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला भाजपचा विरोध
7. कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाईडलाईन प्रसिद्ध, रेमडेसिवीर आणि स्टिरॉईड न देण्याच्या सूचना
8. खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धानावरील एमएसपीत 72 रुपयांची वाढ
9. QS जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईसह देशातील तीन विद्यापीठांना पहिल्या दोनशेमध्ये स्थान, पंतप्रधानांकडून अभिनंदन
10. फडणवीसांचा पुतण्या तन्मयनं आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं उघड, आरटीआयअतंर्गत मिळालेल्या माहितीनंतर आरोप-प्रत्यारोप सुरु