एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

29 January In History : भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट प्रकाशित, समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन; आज इतिहासात...

On This Day : ज्येष्ठ समाजवादी नेते, कामगार नेते, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले. आजच्या दिवशी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट प्रकाशित झाले.

29 January In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते.आजच्या दिवशी ज्येष्ठ समाजवादी नेते, कामगार नेते, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले.  आजच्या दिवशी भारत दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचा (ASEAN) प्रादेशिक भागीदार बनला. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घडामोडी.

1780 : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट ( Bengal Gazette) इंग्रजी भाषेत प्रकाशित केले

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र Bengal Gazette इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या या वृत्तपत्राला 'द कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर' आणि 'हिकीज गॅझेट' असेही म्हणतात. ते साप्ताहिक इंग्रजी वर्तमानपत्र होते. या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक हिकी होते. बंगाल गॅझेटने आपल्या प्रभावी पत्रकारितेच्या जोरावर अनेक लोकांचे भ्रष्टाचार, लाचखोरी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन उघड केले होते. यापैकी एका दाव्यात बंगाल गॅझेटने भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्यावर चुकीच्या कारभाराचा आरोप केला होता. 

1916 : पहिल्या महायुद्धात जर्मनीने प्रथमच फ्रान्सवर हल्ला केला 

पहिले महायुद्ध हे युरोपमधील एक जागतिक युद्ध होते. 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत हे युद्ध चालले होते. हा इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक होता. या उद्धात अंदाजे 90 दशलक्ष सैनिक आणि 13 दशलक्ष नागरिकांचा मृत्यू झाला होता. आजच्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 1916 रोजी पहिल्या महायुद्धात जर्मनीने प्रथमच फ्रान्सवर हल्ला केला होता.

1939 : रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरची स्थापना

रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर ही रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन बेलूर मठ यांची एक शाखा आहे. रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर ही संस्था कोलकाता येथे आहे. जगभरातील धर्मादाय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ही प्रसिद्ध आहे.या संस्थेने जगभरातील संस्कृतींचे कौतुक करून, त्यांच्या समृद्धतेचे मूल्य आणि आदर करून एक प्रकारचे सांस्कृतिक आदान-प्रदान केले आहे. संस्कृती संस्थान हे मिशनचा एक भाग आहे जे सर्व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र आहे. 29 जानेवारी 1939 रोजी श्री रामकृष्ण यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त ही संस्था अस्तित्वात आली.

1949 : ब्रिटनने इस्रायलला मान्यता दिली 

इस्रायल हा नैऋत्य आशियातील एक देश आहे.  19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पुन्हा 20 व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमधील ज्यूंचा छळ झाल्यामुळे युरोपीय (आणि इतर) ज्यू जेरूसलेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात पळून गेले. आधुनिक इस्रायल राज्याची स्थापना 1948 मध्ये झाली. 29 जानेवारी 1949 रोजी ब्रिटनने इस्रायलला मान्यता दिली. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार पॅलेस्टाईनच्या भूमीत इस्राएल देशासाठी काही जमीन देण्यात आली.  

1979 : भारतातील पहिली जंबो ट्रेन सुरू झाली 

आजच्या दिवशी भारतातील पहिली जंबो ट्रेन (दोन इंजिन असलेली) तामिळनाडू एक्सप्रेसला नवी दिल्ली ते मद्रास (आताचे चेन्नई) हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

1989 : लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्यासाठी सीरिया आणि इराणमध्ये करार झाला  

लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्यासाठी सीरिया आणि इराणमध्ये आजच्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 1989 रोजी करार झाला. 

1992 : भारत आसियानचा प्रादेशिक भागीदार बनला

1992 मध्ये भारताला ASEAN चा प्रादेशिक भागीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या करााने व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटन संबंधांना चालना दिली. भारताला 1995 मध्ये पूर्ण संवाद भागीदार बनवण्यात आले होते. ज्यामुळे सुरक्षा आणि राजकीय सहकार्याच्या क्षेत्रांसह सहकार्यासाठी एक व्यापक अजेंडा प्रदान केला होता. 

1994 : भारत सरकारने 'एअर कॉर्पोरेशन कायदा' 1953 रद्द केला

भारत सरकारने आजच्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 1994 रोजी 'एअर कॉर्पोरेशन कायदा' 1953 रद्द केला. 

2010 :  भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या विमानाचे यशस्वी उड्डाण

भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या पाचव्या आवृतीच्या लढाऊ विमानाने रशियाच्या सुदूर पूर्व भागात प्रथमच यशस्वीपणे चाचणी उड्डाण केले. 

2019 : माजी संरक्षण मंत्री, समाजवादी आणि कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

आपल्या एका हाकेवर मुंबई बंद करणारे कामगार नेते, समाजवादी नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आजच्या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. 

जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते.त्यांनी 1994 साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. 

वयाच्या 19 व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. 1949 मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला. 

जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते  आणि दिग्गज उमेदवार स.का.पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यावेळी जॉर्ज यांना जायंट किलर अशी उपाधी मिळाली. मात्र1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी 1974  मध्ये नेतृत्व केले. जॉर्ज फर्नांडिस हे  त्यावेळी इतर कामगारांसह रेल्वे कामगारांचेही नेते होते. दादर रेल्वे स्थानकात उडी मारून त्यांनी रेल्वे  कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात केली.आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. त्यांच्यावर खटलाही चालला. मुंबई कार्यक्षेत्र असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी 1989 पासून आपले राजकीय कार्यक्षेत्र बिहार राज्य निवडले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते बिहारमधून सक्रिय होते. मुंबई महापालिकेत नगरसेवक असताना महापालिकेचे कामकाज हे मराठी भाषेतून झाले पाहिजे अशी आग्रही मागणी करणारे आणि त्याची अंमलबजावणी करून घेण्यात जॉर्ज फर्नांडिस यांचा मोठा वाटा राहिला आहे. 

2020 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Embed widget