एक्स्प्लोर
कसारा घाटात पर्यटकांच्या गाडीला ट्रकची धडक, 10 जखमी
नाशिकः कसारा घाटात पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याजवळ थांबलेल्या वाहनाला ट्रकची धडक दिली आहे. या अपघातात परभणीचे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कसारा घाटातील सायरी खिंड येथे हा अपघात झाला.
अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान पावसाचा आनंद घेण्याचा मोह पर्यटकांच्या जीवावर बेतला आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात विविध धबधबे वाहत आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना धबधब्यांचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. घाटात धोकादायक वळणांवर वाहने थांबतात, त्यामुळे असे अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement