एक्स्प्लोर

ड्रेनेज घोटाळ्यात काम न करताच राजरोस टक्केवारी ते फायर स्टेशनचा स्लॅब टाकतानाच मातीमोल; कोल्हापूर मनपात सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरुच, पालकमंत्र्यांकडून 'कारभाराची' झाडाझडती

कसबा बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात मनपाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानंतर फायर स्टेशनचा स्लॅब टाकतानाच कोसळल्याने पुन्हा एकदा बेफिकीर कारभार समोर आला होता.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) फुलेवाडी येथील अग्निशमन विभागाचा स्लॅब (Fulawadi fire station slab collapse) टाकतानाच कोसळताना एकाचा हकनाक मृत्यू झाला. या घटनेनंतर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर महापालिकेमधील अधिकाऱ्यांच्या कारभाराची झाडझडती घेताना संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी झालेल्या वादळी बैठकीत दिले होते. यानंतर आता कोल्हापूर मनपाच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी (K. Manjulakshmi) यांनी ठपका ठेवण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित केलं आहे. शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना खातेनिहाय चौकशी का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावण्यात आली आहे. स्लॅब टाकतानाच कोसळल्यानंतर ठेकेविरोधात बराले यांनीच फिर्याद दाखल केली होती.  तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणासुदीत पाण्याचा ठणठणाट झाल्याने जल अभियंता हर्षजित घाटगे यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कसबा बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात मनपाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यानंतर फायर स्टेशनचा स्लॅब टाकतानाच कोसळल्याने पुन्हा एकदा बेफिकीर कारभार समोर आला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी यासंदर्भात समिती नेमताना तत्काळ अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. अहवालानंतर ठेकेदारासह अधिकारी सुद्धा दोषी आढळल्याचे दिसून आले. यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या बैठकीसाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार महाडिक तसेच कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार के. मंजूलक्ष्मी यांनी निलंबनाचा आदेश काढला.  

काय म्हणाले होते प्रकाश आबिटकर? (Prakash Abitkar on Kolhapur Municipal Corporation) 

शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई केली जाईल, दंड आकारण्यापर्यंत थांबणार नाही, तर कठोर कारवाई आम्ही करू, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले होते. फुलेवाडीमध्ये जी गंभीर घटना घडली, जिथे स्लॅप बांधायच्या आधी कोसळतो, याच्या इतकं दुर्दैव नसल्याचे ते म्हणाले होते. बांधकाम कोसळण्याच्या घटनेत ठेकेदारावर दोष नाही, तर त्यांच्यावर राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांचेही उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे म्हटले होते.  पाणी पुरवठा करण्यासाठी टाक्या बांधण्याचे काम ठेकेदारानं थांबवले आहे. ठेकेदाराची जबाबदारी तितकीच आहे, पण ठेकेदारापेक्षा आमच्या यंत्रणेतल्या लोकांचा दोष तितकाच असल्याचेही ते म्हणाले होते. 

ड्रेनेज घोटाळ्यातही मनपा अधिकारी निलंबित (Drainage scam Kasba Bawda) 

दुसरीकडे, कसबा बावड्यात पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते रेणुसे, रेडेकर, बडबडे मळ्यापर्यंत ड्रेनेज पाईप टाकणे या विकासकामात काम न करता केवळ कागदोपत्री बिलं दाखवून 72 लाखांचा घोटाळा सत्यजित कदम यांनी समोर आणला होता. यानंतर कोल्हापूर मनपा यंत्रणा हादरून गेली. यानंतर कोल्हापूर मनपाचा नोंदणीकृत ठेकेदार श्रीप्रसाद वराळेनं कोणत्या अधिकाऱ्याला किती टक्केवारी याचीच यादी जाहीर करत स्क्रीनशाॅटही सादर केले. ज्यांच्यावर टक्केवारीचा आरोप झाला त्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी श्रीप्रसाद वराळेविरोधात महापालिकेची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात वराळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरुच आहे. 

कंत्राटदाराकडून आरोप झाल्यानंतर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट तथा सहाय्यक अधीक्षक बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांची उचलबांगडी केली. महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सेवानिवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकौंट सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. पवडी विभागातील कुणाल पवारला सुद्धा निलंबित करण्यात आलं होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
Embed widget