(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीबाधित गायवर्गीय जनावरांची संख्या 1 हजारांवर
कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरु आहे. शनिवारी 8 जनावरे या रोगाने मृत्यूमुखी पडली. जिल्ह्यात या रोगाने शिरकाव केल्यापासून बाधित गायवर्गीय जनावरांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे.
Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप सुरु आहे. शनिवारी जिल्ह्यात 8 जनावरे या रोगाने मृत्यूमुखी पडली. जिल्ह्यात या रोगाने शिरकाव केल्यापासून बाधित गायवर्गीय जनावरांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे. काल जिल्ह्यामध्ये 176 गायवर्गीय जनावरांना लम्पी चर्मरोग झाल्याचे आढळले, तर 8 जनावरांचा मृत्यू झाला. आज अखेर 2 लाख 52 हजार 74 गायवर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास 6 तालुक्यामंध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल 148 गायी व 28 बैलांना लम्पी रोगाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे लम्पीबाधित जनावरांची संख्या 1 हजार 17 झाली आहे. त्यामध्ये 837 गायी व 180 बैलांचा समावेश आहे. रोगमुक्त होण्याच्या दरात वाढ होत आहे. रोग मुक्त होण्याचे प्रमाण 30 टक्यावर आले आहे.
330 जनावरे रोगमुक्त
दरम्यान, बाधित झालेल्या जनावरांमध्ये 245 गायी व 55 बैल बरे झाले आहेत. काल दिवसात 6 गायी व 2 बैलांचा मृत्यू झाला, ही जनावरे हातकणंगले तालुक्यातील आळते, इचलकरंजी, चंदूर व रांगोळी येथील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या 44 वर जाऊ पोहोचली आहे.
टोप येथे आज नवीन एपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 लाख 37 हजार 62 गायी व 15 हजार 12 बैलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाणे 85 टक्के आहे. दरम्यान, लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी उद्या सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारी दूध संस्थांचे प्रतिनिधी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या