एक्स्प्लोर

Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरात कोल्हापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Ambabai Mandir : सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसरात 700 पोलिस कर्मचारी आणि 2,000 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.

Ambabai Mandir Navratri : सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसरात 700 पोलिस कर्मचारी आणि 2,000 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. बॉम्बशोधक पथक दररोज चार वेळा मंदिर परिसराची तपासणी करणार आहे. 

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रादरम्यान सुमारे 12-15 लाख भाविकांनी मंदिराला भेट देण्याची अपेक्षा आहे. मंदिर परिसरात 82 आणि महाद्वार रोडलगत 40 कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. बॉम्बशोधक पथकातील प्रशिक्षित श्वान दिवसातून चार वेळा मंदिर परिसराची पाहणी करतील. याशिवाय वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरभर 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रात्री दहा वाजेपर्यंत शहर परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. नवरात्राचे नऊ दिवस महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंदी असेल. रिक्षा आणि दुचाकींना परवानगी असेल, परंतु गरज भासल्यास गर्दीच्या वेळी त्यांचा प्रवेश देखील बंद केला जाऊ शकतो. महाद्वार रोडवरील व्यापार्‍यांचे सामान व साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच प्रवेश दिला जाईल.

10 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार 

दरम्यान, अंबाबाई मंदिरात सुमारे 10 हजार भाविकांना भोजन-प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी म्हणाले की, महालक्ष्मी धर्मशाळा (वसतिगृह) आणि महालक्ष्मी अन्नछत्र (प्रसाद विभाग) यांनी विशेष व्यवस्था केली आहे. वसतिगृह 24x7 चालेल आणि अन्नछत्र दररोज 1 हजार भाविकांना मोफत जेवण देईल.

वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर पोलिसांकडून नवरात्रोत्सव काळात सुरक्षेसह वाहतूक मार्गात बदल केले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांना वाढीव बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरामध्ये 11 ठिकाणांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget