Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, धनंजय महाडिक म्हणाले, 'कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही'
BJP Maharashtra Padadhikari list: भाजपकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक, नवनाथ बन यांची बढती, कृष्णराज महाडिकांना मोठी संधी, कोणाला कोणतं पद मिळालं, वाचा यादी

Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: यू-ट्युबवरील युथ आयकॉन आणि भाजपचे कोल्हापूरमधील खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यास इच्छूक असूनही कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र, आता भाजपने कृष्णराज याच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या निर्णयानंतर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता राज्यभरातील तरुणांना पक्षामध्ये आणण्यासाठी कृष्णराज काम करेल, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली. भाजप (BJP) पक्ष हा कधीही कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही. मी ज्या पद्धतीने म्हणालो होतो, कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही. त्या वाक्याची आज पहाट झाली, असं म्हणावं लागेल असेही धनंजय महाडिक यांनी म्हटले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP Padadhikari list)
भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक हे विधानसभेसह नगरपालिका निवडणुकीतही लढण्यासाठी इच्छुक होते. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, या दोन्ही निवडणुकांमधून त्यांना पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता महाडिक यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाच्या रुपाने भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कृष्णराज महाडिक हे यू-ट्युब व्लॉगर म्हणूनही लोकप्रिय आहेत. यू-ट्युबवर त्यांच्या चॅनलचे 7 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. कृष्णराज हे आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केले होते.
भाजप पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे
मुख्य प्रवक्ता
नवनाथ बन
भाजप प्रदेश उपाध्यक्ष
अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर
भाजप सरचिटणीस
निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर
भाजप चिटणीस
मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- कृष्णराज महाडिक
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष- चित्रा वाघ
भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष- योगेश टिळेकर
कोषाध्यक्ष
मिहिर कोटेचा
























