Devendra Fadnavis : 'सबका साथ सबका विकास' म्हणत मोदींची विकासाची गाडी सुसाट : देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची आघाडी झाली आहे. ज्यात कोणीच कुणाचे ऐकायला तयार नाही. मात्र, सबका साथ सबका विकास म्हणत मोदींची विकासाची गाडी सुसाट चालली असल्याचे फडणवीस म्हणाले.
कोल्हापूर : ही ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक आहे. या देशाला सुरक्षित कोण ठेवू शकतो या संदर्भातली ही निवडणूक आहे. देश मोदी यांच्या हातामध्ये देण्यासाठी निवडणूक आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकत्र येऊन एक मजबूत महायुती निर्माण झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चंदगडमध्ये कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, रामाच्या हातात धनुष्यबाण आहे, तसा संजय मंडलिक यांची निशाणी धनुष्यबाण आहे हे लक्षात ठेवा आणि मतदान करा.
🕔 4.48pm | 2-5-2024 📍 Chandgad, Kolhapur.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 2, 2024
LIVE | कोल्हापूर लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ चंदगड, कोल्हापूर येथे जाहीर सभा@BJP4Maharashtra @Sanjaymandlik09 #Kolhapur #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar https://t.co/wvanRPVly6
सबका साथ सबका विकास म्हणत मोदींची विकासाची गाडी सुसाट
त्यांनी पुढे सांगितले की, चंदगडकरांच्या दर्शनाची संधी आज मिळाली याचा मला खूप आनंद आहे. ते पुढे म्हणाले की, साखर कारखानदारीला आणि ऊसाच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम मोदींनी केलं.आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षित ठेवू शकतात यासंदर्भातील ही निवडणूक आहे.भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकत्र येऊन एक मजबूत महायुती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची आघाडी झाली आहे. ज्यात कोणीच कुणाचे ऐकायला तयार नाही. मात्र, सबका साथ सबका विकास म्हणत मोदींची विकासाची गाडी सुसाट चालली आहे.
इंजिन आहे डबे कुठेच दिसत नाहीत
फडणवीस म्हणाले की, तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, त्या ठिकाणी केवळ इंजिन आहे डबे कुठेच दिसत नाहीत. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी प्रियांका गांधी यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरे यांना जागा आहे, तर शरद पवार यांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रियाताई यांना जागा आहे तुम्हाला कुठेही जागा मिळणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या