Vishwajeet Kadam Meets Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी विश्वजित कदम थेट कोल्हापुरात; 'सांगली'बद्दल म्हणाले तरी काय?
काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबतचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला असून नाही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.
कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वीच पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांना तगडा झटका बसला. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघारी न घेता सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबतचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला असून नाही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम सांगलीतून कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले
विश्वजित कदमांचा सांगलीवर बोलण्यास स्पष्ट नकार
या भेटीमध्ये काय चर्चा झाली असे विचारण्यात आले असता आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की कोल्हापूर मतदारसंघाच्या अनुषंगाने आमची चर्चा झाली. सांगली लोकसभेबाबत कोणताही चर्चा झाली नाही. विश्वजित कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. कोल्हापूरमध्ये आमच्या संस्था आहेत आणि व्यक्तिगतरित्या शाहू महाराज कुटुंबाबद्दल कदम कुटुंबाला आदर आहे. त्यामुळे त्यामुळे कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूर मधील जी आमची भूमिका आहे त्या संदर्भातील चर्चा केल्याचे ते म्हणाले.
उमेदवारी टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली
दरम्यान, आज कोल्हापुरात बोलताना शरद पवा यांनी सांगली लोकसभेची उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाल्याचा गौप्यस्फोट केला. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी भरत बंडखोरी केली. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायच्या नाहीत असे ठरले होते. कोणत्या पक्षाचा उमेदवार तेथे निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला द्यायची या सुत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. मात्र, याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवाद ठरला. येथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरुनच कळाली. कोण उमेदवार आहे हेही टीव्हीवरुनच समजला. पण, एकदा निर्णय घेतला आहे म्हंटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या