एक्स्प्लोर
भाजप युवा मोर्चाचं रस्त्यावर हनुमान चालीसा पठण, रस्त्यावर नमाज चालतो मग हनुमान चालीसा का नाही?
या प्रकारानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक मंगळवारी हावडा रस्त्यावर हनुमान चालीसाचं पठण केलं जाणार आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील युद्ध काही थांबायचे नाव घेत नाही आहे. 'जय श्रीराम’च्या घोषणेनतंर आता पश्चिम बंगालमध्ये हनुमानाच्या मुद्दावरुन राजकारण तापण्याचं चिन्ह आहे. रस्त्यावर मुस्लिमांच्या प्रार्थनाविरोधात भाजपच्या युवा मोर्चाने हावडाच्या बाली खाल रस्त्यावर हनुमान चालीसाचं पठण केल्याचा प्रकार घडला आहे.
रस्त्यावर हनुमान चालीसाचं पठण करण्याचं आयोजन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ओमप्रकाश आणि प्रियंका शर्मा यांनी केलं होतं. यात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. जर एका धर्मातील लोग शुक्रवारी एकत्र येत रस्त्यावर बसून नमाज पठण करु शकतात तर आम्ही मंगळवारी हनुमान चालीसाचं पठण का करु शकतं नाही? असा सवाल भाजपच्या नेत्याने केला आहे. VIDEO | पश्चिम बंगालचं राजकारण पुन्हा तापलं, जय श्रीरामचा नारा दिल्याने् चिडलेल्या ममतांचा निषेध | ABP Majha या प्रकारानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक मंगळवारी हावडा रस्त्यावर हनुमान चालीसाचं पठण केलं जाणार आहे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, जर शुक्रवारी नमाज पठणं तर आम्ही मंगळवारी हनुमान चालीसा देखील वाचू अशी असं मतं व्यक्त केलं आहे.#WATCH WB: Bharatiya Janata Yuva Morcha recite Hanuman Chalisa near Bally Khal in Howrah. OP Singh, BJYM Pres, Howrah says, "GT Road is blocked to offer Friday namaz. Patients die,people can't reach office on time.Recitation continues till Friday Namaz like that is offered (25.6) pic.twitter.com/BscHgYJt2C
— ANI (@ANI) June 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement