(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Union Budget 2024 Live Highlights : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
Budget Presentation 2024 Live updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट भाषणात मोठ्या घोषणा केल्या. तरुण, शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या.
LIVE
Background
Union Budget 2024 Live Updates : केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या पोतडीतून अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात तीन पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर केला आहे आणि यावेळीही त्यांनी पेपरलेस बजेट सादर केलं. अर्थसंकल्पीय दस्तऐवजांमध्ये वार्षिक आर्थिक विवरण, अनुदानाची मागणी आणि वित्त विधेयक केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲपमध्ये पाहिले जाऊ शकते. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 'Union Budget Mobile App' वर उपलब्ध होईल. बजेट दस्तऐवज ॲपवर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे ॲप www.indiabudget.gov.in वरूनही डाउनलोड करता येईल.
India Budget 2024 LIVE updates in Marathi : तळघरात बंद अधिकाऱ्यांची आज सुटका
अर्थसंकल्प तयार केल्यानंतर, अर्थमंत्र्यांच्या संमतीने अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे अर्थ मंत्रालयाच्या तळघरातील बजेट प्रेसकडे पाठविली जातात. बजेट दस्तऐवज अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय आहे. गोपनीय कागदपत्रे लीक होऊ नयेत, यासाठी अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या छपाईच्या वेळी अर्थ मंत्रालयाचे 100 हून अधिक कर्मचारी अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या छपाईसाठी तळघरात राहतात आणि ते बजेट सादर होईपर्यंत बाहेर पडू शकत नाहीत. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना क्रांती आणणारा अर्थसंकल्प
सदाभाऊ खोत यांची बजेटवर प्रतिक्रिया
शेतीविषयक पायाभूत सुविधा आणि मार्केटिंग बाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत
१ लाख ५२ हजार कोटी ची तरतूद...
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही अर्थसंकल्पात केलं
भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी करण्याचे निर्णय... नवे वारायटी आणण्याचा निर्णय..
शेतकऱ्यांना क्रांती आणणारा अर्थसंकल्प आहे
विरोधकांचे काम आहे की कोणती पण चांगली गोष्ट त्यांना नवडत .... शिमगा करतात....
केंद्र आणि राज्य ने काही योजना आखल्या तर विरोधक उणीव काढतात..त्यांच्या कांगवा ला अर्थ नाही...
शेतकरी चळवळ टिकली पाहिजे हे अत्यंत महातवचे आहे... पण स्वतः च्या अहंकार मुळे स्वाभिमान शेतकरी संघटना ला ग्रहण लागले .. भागाकार खाऊन तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी काम केले... त्यांच्यावर काढण्याची बाब आली...
Union Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे आंदोलन
संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांचे आंदोलन
काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी
Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार कररचनेत बदल
Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech : नव्या करप्रणालीनुसार कररचनेत बदल
०-३ लाख- कर नाही
३-७ लाख - ५ टक्क
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर
Union Budget 2024-25 LIVE: नव्या कर प्रणालीत बदल
Union Budget 2024-25: नव्या कर प्रणालीत बदल करण्यात आलेत.
- 0 ते 3 लाख : 0 कर
- 3 ते 7 लाख : 5 टक्के कर
- 7 ते 10 लाख : 10 टक्के
- 10 ते 12 लाख : 15 टक्के
- 15 लाखांवर उत्पन्न : 30 टक्के आयकर
Union Budget 2024 : ग्रामीण भागातील प्रत्येक जागेसाठी आता भू-आधार
ग्रामीण भागातील जमिनींसाठी यूनिक लँड पर्सनल लँड आयडेटिंफिकेशन नंबर दिला जाईल. त्यालाच भू-आधार म्हटले जाईल.