New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली चेंगराचेंगरीत नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये
New Delhi Railway Station Stampede : दिल्लीतील चेंगराचेंगरीत मृतांमध्ये 14 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (15 फेब्रुवारी) रोजी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे (New Delhi Railway Station Stampede) संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. मृतांमध्ये 14 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई
तीन मुलांसह 18 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. या दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या दोन गाड्या उशिराने गेल्याने स्थानकावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. हे लोक ट्रेनची वाट पाहत होते.दरम्यान, अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्याने लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
फलाटापेक्षा पुलावर गर्दी जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

