एक्स्प्लोर
अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थींचं गंगा नदीत विसर्जन
दिल्ली येथील स्मृती स्थलाहून तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थी देशभरातील सुमारे 100 नदींमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. यावेळी हरिद्वारमधील भल्ला कॉलेज मैदानापासून कलश यात्रा काढण्यात आली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले.
विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. दिल्ली येथील स्मृती स्थळाहून तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थी देशभरातील सुमारे 100 नदींमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.
वाजपेयींच्या स्मरणार्थ सोमवारी दिल्लीतील के .डी. जाधव स्टेडिअममध्ये सर्वपक्षीय प्रार्थना सभा होणार आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांमध्ये प्रार्थना सभांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी शुक्रवारी (17 ऑगस्ट) अंत्यसंस्कार करण्यात आले. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement