Kedarnath Dham : केदारनाथ धामचे दरवाजे मंगळवारी उघडणार, मुख्यमंत्री आणि राज्यपाल उपस्थित राहणार
Kedarnath Dham : चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे मंगळवारी उघडणार आहेत.

Kedarnath Dham : भारतात (india) 12 ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम (chardham) यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ (kedarnath) हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथमधील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन हे दरवाजे बंद ठेवले जातात. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. आता 25 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
मंगळवारी केदारधामचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने त्याची जोरदार तयारी केदारनाथ मंदिर परिसरात सुरु आहे. 23 क्विंटल फुलांची आरास या मंदिराला करण्यात येतेय. मंदिराचे कर्मचारी मंदिर परिसरात मंदिर सजवण्याची तयारी करत आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी शुभ मुहूर्त काढला जातो आणि त्याच मुहूर्तावर हे दरवाजे उघडले जातात. यावर्षी मंगळवारी 25 एप्रिलला सकाळी 6 वाजून 20 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातील. केदारनाथ मंदिर ज्या परिसरात आहे तेथील हवामानात कायम बदल होत असतात. त्यामुळे येथील हवामानाची स्थिती दरवाजे उघडण्यास अडथळा निर्माण करते. सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी होणारी बर्फवृष्टी त्यामुळे येथील हवामानात बरेच बदल होत आहेत.
तसेच केदारनाथाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडणार असल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पहायला मिळतेय. भक्तीभावाने देशभरातून लोकं केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवाजे उघडण्याचा सोहळा पाहण्यासाठी येथे भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण खराब वातावरणामुळे भक्तांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे भक्तांनी सांभाळून राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे.
राज्यपाल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी कार्यक्रमात होणार सहभागी...
या कार्यक्रमावेळी उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित असतील. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी उघडले जातील.
#WATCH | Uttarakhand | The portals of Kedarnath Dham are set to open tomorrow with all the rituals. Final preparations being made for the occasion. 20 quintals of flowers used to decorate the temple. pic.twitter.com/hyEgDm3Ecd
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 24, 2023
संबंधित बातमी..
World Military Expenditure : एवढा झाला जगाचा संरक्षण शस्त्रांवर खर्च... भारत चौथ्या स्थानावर!























