एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 :  फायनलमध्ये भारतानं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच देश

India Win T20 World Cup 2026 : भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026  च्या टी-20  विश्वचषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात भारतानं मोठा विक्रम केला आहे.

India Win T20 World Cup 2026 :  टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026  च्या टी-20  विश्वचषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला होता. या बदल्यात न्यूझीलंडला 159 धावा करता आल्या. भारतानं तब्बल 96 धावांची न्यूझीलंडचा पराभव केला. या कामगिरीनंतर भारतानं एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश

2026  च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. सॅमसनने 89 धावा करत संघाचा सर्वाधिक धावा काढल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा दुसरा सर्वोच्च आणि टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.

जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या

जगात फक्त पाच वेळा एका संघाने एका डावात २५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या पाचपैकी तीन वेळा टीम इंडियाने हे साध्य केले आहे. टी-20 विश्वचषक सामन्यात तीन वेगवेगळ्या वेळी 250+ धावा करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. टीम इंडियाची ही कामगिरी देखील विशेष आहे कारण भारतीय संघाने एकाच विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

टी-20विश्वचषकात सर्वाधिक धावा

260 धावा - श्रीलंका (वि. केनिया)
256 धावा - भारत (वि. झिम्बाब्वे)
255 धावा - भारत (वि. न्यूझीलंड)
254  धावा - वेस्ट इंडिज (वि. झिम्बाब्वे)
253 धावा - भारत (वि. इंग्लंड)

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा

भारताने अंतिम सामन्यात 255 धावा केल्या, जी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. यापूर्वीचा सर्वोच्च धावसंख्या 176 धावा होता, जो टीम इंडियाने 2004 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही केला होता. आता, टीम इंडियाने 255 धावा करून स्वतःच्या नावावर नवीन विक्रम केला आहे. 

अभिषेकसह संजू सॅमसनचं तांडवं तर बुमराह आणि पटेलची जादू

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना  भारतानं जिकंला.  यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली. टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केलं. त्याने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात  27 धावा देत 3 विकेट घेतल्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
GT vs MI Live Score IPL 2026 : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
GT vs MI Live Updates : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
Suryakumar Yadav GT vs MI IPL 2026 : सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
Who is Danish Malewar : बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget