आपल्या PF च्या एका हिस्स्याची InvITs मध्ये गुंतवणूक होणार; जाणून घ्या काय आहे InvITs
पायाभूत सुविधा विकास क्षेत्रामध्ये आता आपल्या प्रॉव्हिडंट फंडच्या काही रक्कमेची InvITs च्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे EPFO कडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची व्याप्ती वाढणार आहे.
नवी दिल्ली : आपल्या पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडच्या एका हिस्स्याची रक्कम आता इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट्स म्हणजे InvITs मध्ये गुतंवण्यात येणार आहे. एंप्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन (EPFO) लवकरच अशा प्रकारचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे देशातील पायाभूत क्षेत्राचा विकास होऊन ते अधिक मजबूत होणार आहे. त्याचबरोबर EPFO कडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची व्याप्तीही वाढणार आहे.
EPFO कडून सध्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) मध्ये गुंतवणूक करण्यात येते. आता त्यामध्ये InvITs ची भर पडणार आहे.
InvITs हे अशी गुंतवणूक असेल ज्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या सर्व कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर असेट्स आणि संबंधित विविध प्रकल्प हे एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करुन त्या आधारे नफा कमावता येऊ शकेल. InvITs हे एक अल्टरनेटिव्ह इनव्हेस्टमेंट फंड (AIF) आहे जे म्युच्युअल फंडप्रमाणे काम करतं. यावर सेबीचे नियंत्रण असते.
InvITs मध्ये वितरित करण्यात येणाऱ्या नेट कॅश फ्लोमधील 90 टक्के यूनिट हे गुंतवणूकदारांना देणं बंधनकारक आहे. त्याचसोबत अंडर कन्स्ट्रक्शन असेट्समध्ये गुंतवणूक करण्याची एक मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे असेट्सला मॉनेटायझेशन करण्यासाठी InvITs हा एक उत्तम पर्याय आहे.
एंप्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन ची स्थापना 1952 साली करण्यात आली आहे. सध्या भारतातील 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातील ठराविक रक्कम ही या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा करण्यात येते. वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी या रक्कमेचा वापर करण्यात येतो. निवृत्त होताना शेवटी ही रक्कम आणि त्यावरचे व्याज हे संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात येते.
महत्वाच्या बातम्या :