रेल्वे स्टेशनवर आता चहाच्या प्लॅस्टिक कपची जागा घेणार पर्यावरणपूरक 'कुल्हड'
भारतातील सर्व रेल्वे स्टेशनवर आता प्लॅस्टिकच्या कपाऐवजी आता मातीच्या कुल्हडमधून चहा मिळणार आहे. यामुळे सर्व रेल्वे स्टेशन प्लॅस्टिक मुक्त होतील अशी आशा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केली आहे.
जयपूर: आता सर्व रेल्वे स्टेशनवरचे चहाचे प्लॅस्टिक कप हद्दपार होणार आहेत. त्याची जागा पर्यावरणपूरक कुल्हड घेणार आहेत. रविवारी राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यात उत्तर-पश्चिम रेल्वेच्या एका कार्यक्रमात बोलताना रेल्वमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली.
रेल्वेच्या या धोरणामुळे प्लॅस्टिक मुक्त भारताकडे आपण एक पाऊल टाकतोय असे ते म्हणाले. सुमारे 400 रेल्वे स्टेशनवर आजच्या घडीला चहा हा कुल्हडमधून देण्यात येतोय. यापुढे चहासाठी केवळ कुल्हडचा वापर करण्याचे धोरण रेल्वेने आखल्याचंहीपियूष गोयल यांनी सांगितलं.
रेल्वेच्या या धोरणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच त्यामुळे लाखो रोजगारही निर्माण होणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी प्लॅस्टिकमुक्त भारताचे आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय रेल्वेने स्टेशनवर चहासाठी प्लॅस्टिकचा वापर न करता कुल्हडचा वापर करण्याच ठरवलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही : रेल्वेमंत्री पियूष गोयल
- लॉकडाऊनमुळे अभियंता झाला चहा विक्रेता, वाशीमच्या तरुणाची कहाणी
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Onion Export Ban | केंद्राच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल : शरद पवार