लॉकडाऊनमुळे अभियंता झाला चहा विक्रेता, वाशीमच्या तरुणाची कहाणी
लॉकडाऊनमध्ये वाशिमच्या कारंजा येथील एका तरुण इंजिनिअरची नोकरी गेली. मात्र, नैराश्य न बाळगता हताश न होता या तरुणाने धैर्याने आपल स्वत:चा व्यवसाय थाटला आहे.
वाशीम : भारतात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करता लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाऊने अनेकांना चांगले वाईट दिवस दाखवले. कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बुडाले आणि बदलले. त्या पैकी वाशिमच्या कारंजा येथील एका तरुण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची ही नोकरी गेली. मात्र, नैराश्य न बाळगता हताश न होता या तरुणाने धैर्याने आपल स्वत:चा व्यवसाय थाटला आहे. महिन्याला 15 हजार रुपयाच्या नोकरीपेक्षा व्यवसायातून तो महिन्याला 35 हजार ते चाळीस हजार रुपये कमावतोय.
वाशीमच्या कारंजा लाडचे सारंग राजगुरे या तरुणाने बी ई मेकॅनिकलच शिक्षण पूर्ण केलं. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात आपली पदवी प्राप्त केली आणि इतर तरुणांप्रमाणे मुंबई, पुण्याला नोकरीचं स्वप्न पाहिलं आणि नोकरीसाठी पुणे गाठलं. काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भोसरीच्या एका खाजगी कंपनीत नोकरी ही मिळाली. ती 15 हजार रुपये महिन्याची मात्र एवढ शिक्षण घेऊन 15 रुपयाची नोकरी करत असतांना कोरोनाने सगळ जग थांबल आणि सारंगची नोकरी गेली.
सारंग गावी कारंजा येथे परतला सारंगचे वडील कारंजा येथील एसटी महामंडळात कर्मचारी आहेत. त्यांचाही पगार होत नव्हता. महामंडळच्या एसटी बसचे चाक ही थांबले होते. त्यामुळे वडिलांचा पगार देखील थांबला. सारंगची नोकरी गेली परिवारावरचा आर्थिक ताण वाढत गेला तर दुसरीकडे काय कराव सुचत नव्हतं. सारंगला लहानपणापासून आवड होती हॉटेलिंग व्यवसायाची त्यामुळे मग त्याने चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कुठलाही कमीपणा न बाळगता कारंजा शहरातील पोहा वेस येथील सरकारी जागा सारंगने निवडली आणि केवळ 20 हजार रुपये खर्च करून आपला व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु करताच उत्तम प्रतिसाद ग्राहकांकडून मिळायला लागला.
हा व्यवसाय सुरु करून आज दोन महिने झाले. चांगली कमाई होत असून महिन्याकाठी 35 हजार ते 40 हजार रुपये सारंगच्या हाती येत आहे. चहाचा आस्वाद फक्कड असतो आणि इंजिनीअरच शिक्षण घेऊनही कुठलचं काम कमी नसत हे सारंगने सिद्ध केल आहे अशी भावना चहा प्रेमी व्यक्त करतात. समाजातील अनेक तरुण छोट्या छोट्या गोष्टी न प्राप्त झाल्याने हताश होतात आणि टोकाचं पाऊल उचलतात. मात्र,सारंग उच्चशिक्षित असूनही आपल्या शिक्षणाचा बाऊ न करता मिळालेल्या संधीच सोन करत कोणतच काम लहान किंवा मोठं नसून जिद्द व इच्छाशक्ती जोरावर यश गाठता येते हे सारंग सिद्ध केलं आहे. सारंगचा हा प्रयत्न समाजाला खचलेल्या युवकांना दिशा देणारा ठरणार आहे.