Covid-19 | देशात एका दिवसात 11 हजारांहून अधिक कोरोना बाधित; भारतातील रुग्णांची संख्या 3 लाख पार
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच भारतातील रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पार पोहोचली आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पार पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11458 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 386 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग 9व्या दिवशी 9,500 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशात काल (शक्रवारी) कोरोना बाधितांची संख्या दर तासाला 477 ने वाढली, तर 297 रुग्ण बरे होऊन घरी जात होते. तर दर तासाला 16 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 लाख 08 हजार 993 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 8884 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एक लाख 54 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने शुक्रवारी भारताने ब्रिटनला मागे सोडलं. त्यामुळे भारत जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, रूसनंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्ण अमेरिका अमेरिका (2,116,672), ब्राजील (829,902), रूस (511,423)मध्ये आहेत. तर भारत रुग्ण वाढीचा वेगात जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एक दिवसात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.
पाहा व्हिडीओ : Special Report | देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन? व्हायरल मेसेजमुळे खळबळ
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत टॉप-5 राज्य
आकडेवारीनुसार, देशात सध्या 1 लाख 45 हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 48 हजारांहून अधिक कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यानंतर दुसरा क्रमांकावर दिल्ली, तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारत असा चौथा देश आहे, जिथे सध्या सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
राज्यसभेच्या निवडणुकीत पळवापळवीचं राजकारण, तीन राज्यांमध्ये भाजपचं काँग्रेसपुढे आव्हान
कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद, सरकारचा निर्णय
दिलासादायक... भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, आयसीएमआरची माहिती