एक्स्प्लोर

कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद, सरकारचा निर्णय

कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी ट्विट करुन पाचवीपर्यंत ऑनलाईन क्लासेस बंद असतील, असं सांगितलंय. सातवीपर्यंत बंद करण्याचा प्रस्ताव अनौपचारीक चर्चेत काही कॅबिनेट मंत्र्यांनी दिला होता, मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

मुंबई : कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच एलकेजी-युकेजीचेही ऑनलाईन क्लासेस, शिक्षण ऑनलाईन घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. खाजगी शाळांना ई क्लासेससाठी फी आकारता येणार नाही. ऑनलाईन क्लासेससाठी सर्वांकडेच सुविधा असेल असं नाही आणि ती दरी वाढू नये असेही प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठीचे सर्व मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केले जाणार आहेत. कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी ट्विट करुन पाचवीपर्यंत ऑनलाईन क्लासेस बंद असतील, असं सांगितलंय. सातवीपर्यंत बंद करण्याचा प्रस्ताव अनौपचारीक चर्चेत काही कॅबिनेट मंत्र्यांनी दिला होता, मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय. लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आहे. त्या अनुषंगाने शासकीय, खासगी, अनुदानीत व विनाअनुदानित शाळांतील पहिली ते पाचवीच्या वर्गातील मुलांचे ऑनलाईन शिक्षण सरकारने रद्द केले आहेत. राज्यात बालवाडी, उच्च बालवाडी आणि प्राथमिक वर्ग (इयत्ता 1 ते 5) वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह व्हर्च्युअल वर्ग घेता येणार नाहीत, असं सुरेश कुमार यांनी सांगितलंय. कर्नाटक शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध विषयाची ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. राज्यातील शाळांना सुट्टी असली तरी अनेक खासगी व सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. असे ऑनलाईन क्लासेस शाळेमधील शिक्षणाला पर्याय ठरु शकत नाही, अशा क्लासेसमुळे मुलाच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचं कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांचं मत आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स  (NIMHANS) ने सहा वर्षाखालील मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस चांगले नसल्याचा अहवाल दिला आहे. त्याचा हवाला मंत्री सुरेशकुमार यांनी दिला आहे. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांनी रोज एक तासापेक्षा जास्त वेळ स्क्रिन बघनं हितकारक नसल्याचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळं शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करुन माध्यमिक शाळांसाठीचे ऑनलाईन क्लासेस सुरु राहतील, असं शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Embed widget