एक्स्प्लोर

Chandrayaan-2 मोहिमेची तयारी पूर्ण, 15 जुलैला अवकाशात झेपावणार

चांद्रयान-2 या मोहिमेद्वारे ऑर्बिटर, लैंडर आणि रोवर पहिल्यांदाच चंद्रावर पाठवलं जाणार आहे. या मोहिमेसाठी तब्बल 800 कोटींचा खर्च येणार आहे.

श्रीहरिकोटा : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या चांद्रयान-2 या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलैला पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग होणार आहे. इस्रो अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. तसेच या मोहिमेची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. सिवन यांच्या हस्ते करण्यात आले. चांद्रयान-2 या मोहिमेद्वारे ऑर्बिटर, लैंडर आणि रोवर पहिल्यांदाच चंद्रावर पाठवलं जाणार आहे. या मोहिमेसाठी तब्बल 800 कोटींचा खर्च येणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश बनणार आहे. चंद्रावर पाणी असल्याचा शोध चांद्रयान एकच्या मोहिमेत लागला होता. आता चांद्रयान दोन मोहिमेत तिथल्य़ा वातावरणासह माती परिक्षणाची जबाबदारी असणार आहे. चांद्रयान 2 हे गेल्या 11 वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतिक्षेत होत. 2008 साली चांद्रयान 1 ने उड्डाण घेतलं. त्यानंतर जगापाठीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली. 2013 साली चांद्रयान 2 झेपावणार होतं. मात्र रशियानं प्रकल्पातून माघार घेतल्यानं उड्डाण रखडलं. असंख्य आव्हानं आणि अडचणींना मात करत अखेर चांद्रयान 2 झेपावणार आहे. Chandrayaan 2 | चांद्रयान 2 झेप घेण्यास सज्ज, चंद्रावर रोवर उतरवणारा भारत जगात चौथा देश | ABP Majha कशी असेल मोहिम चांद्रयान2 ?
  • चांद्रयान 2 चं लॉन्चिंग 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे
  • 6 सप्टेंबर 2019ला चांद्रयान चंद्रावर उतऱण्याची शक्यता आहे
  • चांद्रयान 2 साठी तब्बल 800 कोटींचा खर्च लागणार आहे
चांद्रयान2 मोहिमेची वैशिट्य काय?
  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार
  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान दोनला 55 दिवसांचा कालावधी लागणार
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल
  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार
चांद्रयान2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान
  • अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान दोनच्या गतीवर नियंत्रण ठेवणे
  • चांद्रयान दोन पृथ्वीपासून 3 लाख किमींच्या अंतरावर असल्यानं त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे
  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे
  • चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget