एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal: प्रशिक्षकासोबत वाद, अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ; यशस्वी जैस्वालने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला?

Ajinkya Rahane And Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने गोव्याच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Ajinkya Rahane And Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याला देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळायचे नाही, या संदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागितले आहे. यशस्वी जैस्वालने मंगळवारी (1 एप्रिल) एमसीएला एक ईमेल लिहून पुढील हंगामासाठी मुंबईहून गोव्यात त्यांचा क्रिकेट राज्य संघ बदलण्यासाठी एनओसी मागितली आहे. यशस्वी जैस्वालने अचानक घेतलेल्या निर्णयावरुन क्रिकेटविश्वात विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने यशस्वी जैस्वालवर निशाणा साधला होता. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोणतेही कारण न देता देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले होते. यानंतर यशस्वी जैस्वाल मुंबई क्रिकेट संघाकडून खेळला. परंतु जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात फक्त 4 आणि दुसऱ्या डावात 26 धावा केल्या होत्या. तसेच मुंबईने हा सामना 5 विकेट्सने गमावला.

यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद?

अजिंक्य रहाणे हा मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाचा कर्णधार आहे. तसेच यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात संबंध काही चांगले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एका सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वालने अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ मारली होती, असंही बोललं जात आहे. 2022 मध्ये अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला एका सामन्यादरम्यान बाहेर पाठवले होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी यशस्वी आणि साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजा यांच्यात वाद झाला. पहिल्या वेळी 50व्या षटकात हा वाद झाला. पण रहाणे आणि पंचांनी तो शांत केला. मात्र 57व्या षटकात पुन्हा एकदा वाद वाढला. त्यानंतर रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आणि यशस्वीला मैदानाबाहेर पाठवले. यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात खेळत आहेत. अजिंक्य रहाणे हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. तर यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.

यशस्वी जैस्वाल कारकीर्द- 

यशस्वी जैस्वालने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3712 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 265 आहे. यशस्वी जैस्वालने प्रथम श्रेणी सामन्यात 13 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. यशस्वी जैस्वालने लिस्ट ए मध्ये 33 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1526 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल सध्या भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. यशस्वी जैस्वालने 19 कसोटी, 1 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. यशस्वी जैस्वालने कसोटीत 4 शतके आणि टी-20 मध्ये 1 शतक झळकावले आहे.

संबंधित बातमी:

IPL 2025 Points Table: 300 धावा उभारण्याची ताकद, पण आता दहाव्या क्रमांकावर; आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!

व्हिडीओ

Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Embed widget