एक्स्प्लोर
Mumbai rain : अवकाळीनं वातावरण फिरलं, कुठे गारा, कुठे वादळीवारा; मुंबई, पुणे, लोणावळ्यात पाऊस, पाहा PHOTOS
मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण फिरलंय. तर, काही ठिकाणी गारा, तर कुठे वादळी वारा आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
unseasonable rain in pune mumbai maharashtra
1/8

मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण फिरलंय. तर, काही ठिकाणी गारा, तर कुठे वादळी वारा आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
2/8

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहेत. सध्या उकाड्याने हैराण झाले असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मगं झाल्याचे दिसून येत आहे.
3/8

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ उडाली तर नागरिकांची पळापळ झाली.
4/8

सकाळपासून उकाडा होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना अचानक वातावरणामध्ये बदल दिसला. वादळी वारा व पावसामुळे काही ठिकाणी पत्रे कोसळली तर झाडाच्या फांद्याही पडल्या. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे
5/8

वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम झाला असून आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये पत्रा अडकल्याचं दिसून आलं. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाहेरून पत्रा उडून ओव्हर हेड वायरवर येऊन पडला होता.
6/8

कसाऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर काहीकाळ परिणाम झाला. एक लोकल पंधरा मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेस 8 मिनिटे थांबली होती. पंधरा ते वीस मिनिटे वाहतूक सुरळीत होण्यास लागली
7/8

दरम्यान, लोणावळा घाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे गाडी चालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
8/8

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर, आणि बोगद्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली
Published at : 04 Apr 2025 06:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















