एक्स्प्लोर

मोठी बातमी :  कर्नाटक रक्षण वेदिकेचा मनसेला पाठिंबा, बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये त्या त्या राज्यातील भाषा बोलण्याचं समर्थन!

बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये त्या त्या राज्यातील भाषा बोलण्याचं समर्थन कर्नाटक रक्षण वेदिकेनं समर्थनं दिलं आहे. याबाबत मनसेच्या भूमिकेला कर्नाटक रक्षण वेदिकेनं पाठिंबा दिला आहे.

Karnataka Rakshasa Vedike  : महाराष्ट्र राज्यातील बँका (Bank) आणि दुकानांमध्ये मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांमुळं स्थानिक मराठी लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्रात चालवत असलेल्या संघर्षाला कर्नाटक रक्षण वेदिके (Karnataka Rakshasa Vedike )  पाठिंबा दिली आहे. कर्नाटक रक्षण वेदिके ने सुरुवातीपासूनच भारतीय संघराज्यातील प्रत्येक भाषेला त्यांच्या संबंधित राज्यात प्रथम स्थान द्यावे, असा आग्रह धरला असल्याची माहिती कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यात मराठी न बोलणाऱ्या दुकाने आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध आवाज उठवत आहेत. या मुद्यावरुन  नारायण गौडा यांनी ट्वीट करत त्यांची भूमिका मांडली आहे.

बँका आणि दुकानांमध्ये राज्याची भाषा न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याचे मूळ कारण म्हणजे भारत सरकारचे नियम असल्याचे नारायण गौडा म्हणाले. बँकेची भरती परीक्षा, जी फक्त संबंधित राज्यातील तरुणांसाठी खुली असायला हवी होती, ती उत्तर भारतातील तरुणांना मदत करण्यासाठी बदलण्यात आली आणि ग्राहक सेवा कायदा बिगर हिंदी ग्राहकांच्या हक्कांना कोणतेही महत्त्व देत नाही असेही ते म्हणाले.  कर्नाटक रक्षण वेदिकेचा संबंधित राज्यांमध्ये त्यांच्या भाषांचे जतन आणि विकास करण्यासाठी लढणाऱ्या भाषा संघटनांच्या संघर्षाचे समर्थन दिले आहे. या संदर्भात, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यशाची शुभेच्छा देतो, जी महाराष्ट्रातील बँका आणि दुकाने मराठीत व्यवहार करण्याची मागणी करत आहे. कर्नाटकातील बँका आणि दुकाने कन्नड भाषेचा वापर सक्तीने करण्यासाठी संघर्ष करत आहेत. केंद्र सरकारने गैर-कन्नड कर्मचाऱ्यांना परत बोलावून त्यांच्या राज्यात परत पाठवावे. या संदर्भात, आम्ही प्रभावित राज्यांमधील संघटनांसोबत काम करु असेही नारायण गौडा म्हणाले.

 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी भाषेवरून वाद होताना दिसत आहे. मराठी माणसांना हिंदीत किंवा मारवाडी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्याचे प्रमाण वाढतच आहे. हजारो किलोमीटरवरुन मुंबईत कामाला यायचे आणि इथे आल्यानंतर मराठी भाषेचा अपमान करायचा याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यासंबंदी विशेषतः काही हिंदी भाषकांची मुजोरी अधिकच वाढताना दिसत आहे. त्यामुळे 'आपल्याच घरात हाल सोसते मराठी' अशी काहीशी अवस्था मराठी भाषेची आणि मराठी माणसाची झाल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

VIDEO: मराठी नाही, हिंदीतच बोलणार! वर्सोव्यातील डी मार्टच्या हिंदी कर्मचाऱ्याचा माज, मनसेच्या कानफटीनंतर जाग्यावर आले

 

महत्त्वाच्या बातम्या

राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Koyna Dam Water Dispute : कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? जाणून घ्या राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget