(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहावी पास विद्यार्थ्यांना मिळतात 10 हजार रुपये, 'या' राज्यात विद्यार्थ्यांसाठी खास योजना
Bihar Government : या योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे शिक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, घराचा पत्ता, बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर गोष्टी असणे आवश्यक आहे.
मुंबई : शिक्षणाला ( Education ) चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. अशीच एक योजना बिहार सरकारने (Bihar Government) राबवली आहे. बिहार सरकारने शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुखमंत्री बालक बालिका योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्यानंतर बक्षीस म्हणून पैसे दिले जातात. विद्यार्थी प्रथम श्रेणीने दहावी पास (10th ) झाला तर त्याला 10,000 रुपये दिले जातात.
बिहार सरकार (Bihar Government) या योजनेचा लाभ फक्त 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच देते. याबरोबरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतून दुसरा क्रमांक आल्यानंतर आठ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
मुख्यमंत्री बाल बालिका योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना बिहारच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर वेबपेजवर नोंदणीकृत वर क्लिक करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. नोंदणी योग्य असल्याचे आढळल्यास अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.
या योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे शिक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, घराचा पत्ता, बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर गोष्टी असणे आवश्यक आहे.
Bihar Government : कोण अर्ज करू शकतो
अर्ज करणारा विद्यार्थी बिहार राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तो बिहार सोडून इतर कोणत्याही राज्यातील असेल आणि बिहारमधून शिक्षण घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच अर्जदाराचे लग्न झालेले नाही, अशी अटही सरकारने घातली आहे.
शिक्षणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी बिहार सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी ही विशेष योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागेल आणि त्यातून चांगले विद्यार्थी घडतील अशी बिहार सरकारची या योजनेमागची भूमिका आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाठी गोडी निर्माण होण्यासाठी बिहार सरकारकडून अशा विविध योजना राबण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
BJP Protest: ''निघून जा नाहीतर तुझं तोंड फोडेल''; राज्यपालांना माफी मागण्यास सांगणाऱ्याला भाजप कार्यकर्त्याची दमदाटी
Neelam Gore: सीमावादावर महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रस्ताव मांडला जाईल; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI