एक्स्प्लोर

BJP Protest: ''निघून जा नाहीतर तुझं तोंड फोडेल''; राज्यपालांना माफी मागण्यास सांगणाऱ्याला भाजप कार्यकर्त्याची दमदाटी

BJP Protest: राज्यपालांना आधी माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या सामान्य नागरिकाला भाजप कार्यकर्त्यांनी दमदाटी केली. दादर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.

BJP Protest: अडचणीचे प्रश्न विचारणे हे बऱ्याच राजकीय पक्षांना रुचत नाही. नेत्यांच्या समर्थकांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधीतरी सामान्य नागरिकांनी उलट प्रश्न विचारणे गैरसोयीचे ठरते. असाच एक प्रकार आज दादरमध्ये (Dadar) घडला.  हिंदू धर्मातील देवीदेवता आणि महापुरुषांबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांकडून माफीची मागणी करण्यासाठी भाजपकडून (BJP Protest) दादर रेल्वे स्थानकाबाहेर (Dadar Railway Station) आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यावेळी राज्यपालांना माफी मागण्यास सांगा असे सांगणाऱ्या सामान्य नागरिकाला दमदाटी करण्यात आली. ही दमदाटी भाजपच्या कार्यकर्त्याने (BJP Activist) केली. या घटनेची दादर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. 

आज मुंबईत एकीकडे महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिंदू धर्मातील देवीदेवता आणि महापुरुषांबद्दल कथित वादग्रस्त केलेली वक्तव्यांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. 

नेमकं काय घडलं?

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना एक सामान्य व्यक्ती हे आंदोलन पाहत होता. त्यावेळी त्याने अचानकपणे, तुमच्या राज्यपालांना आधी माफी मागायला सांगा, अशी मागणी केली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला आंदोलन स्थळापासून दूर नेले. यावेळी भाजप कार्यकर्त्याने त्या व्यक्तीला धमकी दिली. इथून निघून जा, नाहीतर तुझं तोंड फोडतो अशी धमकी त्याला दिली गेली. पोलिसांनी या नागरिकाला दूर नेले. काही वेळ इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ती व्यक्ती तिथून लांब होताच आंदोलन पुन्हा सुरू झाले. ही व्यक्ती निघून जात असताना भाजप कार्यकर्त्यांकडून त्याच्याविरोधात शेरेबाजी करण्यात येत होती. 

भाजपकडून राज्यभरात आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या व्हिडिओतील वक्तव्यावरून भाजपने आज राज्यभरात 'माफी मांगो' आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे मंत्री, नेते सहभागी झाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Embed widget