एक्स्प्लोर
Advertisement
अमोल यादवांच्या पहिल्या स्वदेशी विमानाला लालफितीचा ब्रेक
अमोल यादव यांनी तयार केलेलं सहा आसनी विमान केवळ डीजीसीए ( डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन) ची नोंदणी होत नसल्यानं उड्रड़ाणापासून रखडलं आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान तयार करुन ते आकाशात उडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव या मराठी तरुणाच्या स्वप्नांना नोकरशाहीच्या लालफीतीच्या कारभारामुळे ब्रेक लागला आहे. चारकोपमधल्या आपल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं सहा आसनी विमान केवळ डीजीसीए ( डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन) ची नोंदणी होत नसल्यानं उड्रड़ाणापासून रखडलं आहे.
2011 म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून अमोल यादव या विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे अमोल यादव यांचं हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया वीक'मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहचवला होता.
महाराष्ट्र सरकारनं या धडपडीचं कौतुक करत अमोल यांना 19 आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. अमोल यांनी 19 आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे. पण त्याआधी 6 आसनी विमानाचं यशस्वी उड्डाण करुन दाखवणं त्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.
डीजीसीएकडून मात्र त्यांना परवानगीत सातत्यानं अडथळे आणले जात आहेत. भारतात नोंदणी होत नसेल तर अमेरिकेत या विमानाची नोंदणी करण्याचा पर्याय अमोल यांच्यासमोर आहे. ज्या प्रक्रियेसाठी भारतात 6 वर्षे गेली, ती अमेरिकेत एका महिन्याच्या आतही पूर्ण होऊ शकते. पण नोंदणी अमेरिकेत झाल्यास ते विमान स्वदेशी राहणार नाही अशी खंत अमोल यांना वाटते.
देशात सध्या सगळीकडे मेक इन इंडियाचा नारा दिला जात आहे. ease of doing business चे दाखले दिले जात आहेत. मात्र अथक मेहनतीनं बनवलेल्या एका विमानाचं स्वप्न सध्या अशा पद्धतीनं नोकरशाहीच्या जाळ्यात अडकलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सांगली
निवडणूक
करमणूक
Advertisement