एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उन्नाव पीडितेची हृदयद्रावक कहाणी; न्यायासाठी जाताना घात

उन्नाव पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. पोलीसांनी दिरंगाई केल्यामुळे घटना घडली असल्याचाही आरोप पीडितेच्या कुटुबीयांनी केला आहे.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणात झालेल्या एन्काउंटरवरुन देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच ही घटना घडल्याने पुन्हा एकदा देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. प्रेमात झाली फसवणूक - उन्नाव प्रकरणातील पीडितेला गावातीलच शिवम त्रिवेदी या व्यक्तीने आपल्या प्रेमात ओढले. शिवमने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर 2018 मध्ये बलात्कार केला. यादरम्यान याचं व्हिडीओ शुटींग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याच काळात शिवमच्या मित्रानेही त्याला साथ दिली. आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊन विश्वासघात केल्याने पीडितेला याचा मानसिक धक्का बसला. पोलीसांनी लवकर तक्रार घेतली नसल्याचा आरोप - ही घटना घडल्यानंतर पीडितेने न्यायासाठी पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, पोलीसांनी ठाण्याच्या फेऱ्या मारायला लावल्याचा आरोप पीडीतेच्या कुटुंबांकडून करण्यात आला आहे. पोलीसांनी हात वर केल्याने पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आरोपींच्या विरोधात केस दाखल झाल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबाला धकम्या येऊ लागल्या. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एका आरोपीला 10 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, 5 डिसेंबरला पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात होती. याच केसच्या संदर्भात पीडिता सकाळी कोर्टात जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे. सर्व आरोपी पोलीसांच्या ताब्यात - पीडितेच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून एसआयटीकडून तपास सुरु आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेला लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित बातम्या - उन्नावच्या निर्भयाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया म्हणतात.. Unnao Rape Case | उन्नावमधल्या बलात्कार पीडित तरुणीचा अखेर मृत्यू | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget