एक्स्प्लोर

पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका

सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी.

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची (Gas) तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. पुण्यातील (Pune) विद्युत गॅस दाहिनीलाही याचा फटका बसला आहे. 

सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे, आणि उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे.

पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. येथे एकूण पाच गॅस दाहिन्या असून, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच करण्यात येत आहेत. दरम्यान, या संदर्भात गॅस दाहिनी चालवणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. 

गॅस दरवाढीमुळे महिलांच्या तक्रारी

पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी तक्रारही महिलांनी केली आहे.

मुख्यमंत्र्‍यांनी गॅस तुटवड्याचे वृत्त फेटाळले

गॅस तुटवड्यांसदर्भातील वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. माध्यमांनी नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करू नये. जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळत आहे. वेगवेगळ्या बातम्या दाखवून नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे देशाच्या हिताचं नाही. केंद्र सरकारने याबद्दल स्पष्टपणे सांगितला आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी गॅसच्या तुटवड्यासंदर्भात माहिती दिली. 

हेही वाचा

पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget