एक्स्प्लोर
Advertisement
उन्नावच्या निर्भयाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास
उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात पीडित तरुणीने अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली : आगीच्या हवाली करण्यात आलेल्या उन्नावमधल्या बलात्कार पीडित तरुणीचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात तिनं अखेरचा श्वास घेतला. रायबरेलीतून सुनावणीसाठी जाताना तिला आरोपींनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 90 टक्के भाजली होती. अखेर काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी हृदय विकाराचा झटक्याने तिचा मृत्यू झाला.
“आमच्या अथक प्रयत्नांनंतरही आम्ही पीडित तरुणीला वाचवू शकलो नाही. संध्याकाळी तरुणीची तब्येत खूप खालावली. रात्री 11 वाजून 10 मिनिटाला तरुणीला हृदय विकाराचा झटका आला. आम्ही तीला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण 11 वाजून 40 मिनिटांनी तीचा मृत्यू झाला” अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शलभ कुमार यांनी दिली.
बलात्कार पीडित तरुणीला केरोसिन टाकून जाळण्यात आल्यानंतर तीला सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी तीला विमानतळ ते सफदरजंग रुग्णालयात ग्रीन कॉरीडोर तयार केला होता. तीला लखनऊवरुन विमानाने दिल्लीला आणण्यात आलं होतं.
ब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...
पीडित तरुणी डॉ. शलभ कुमार यांनी पहिल्याच दिवशी वेंटिलेटर ठेवलं होतं. तरुणीच्या शरिराचे महत्त्वाचे भाग काम करतं नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अखेर रुग्णालयातील डॉक्टरांनी तीच्यासाठी वेगळा आयसीयू कक्ष तयार करण्यात आला होता.
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून तिच्यावर हल्ला केला होता. यात हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश बाजपेयी आणि बलात्कारातील आरोपी शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी यांनी हल्ला केला. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं.
2018 साली आरोपी शिवम त्रिवेदी, शुभम त्रिवेदी यांनी अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. याच संदर्भातील प्राथमिक तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी जळलेल्या लस्थेतच खूप दूरपर्यंत पळत आली होती. प्रत्यक्षदर्शिंनी तीला पाहिल्यानंतर त्यांनी याबाबची माहिती पोलिसांना दिली.
Hyderabad Rapist Encounter | हैदराबाद एन्काऊंटनंतर निर्माण झालेले काही प्रश्न!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement