(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmedabad Serial Blast : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील 56 जणांच्या मृत्यूला जबाबदार 'हे' 49 दोषी
Ahmedabad Serial Blast Verdict : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात 38 दोषींना फाशीची शिक्षा. इतिहासात प्रथमच सर्वाधिक दोषींना फाशी तर अकरा जणांना मरेपर्यंत जन्मठेप.
Ahmedabad Serial Blast : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत तब्बल 49 दोषींना शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 38 जणांना फाशी, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरण म्हणजे, अवघ्या देशासाठी काळा दिवस. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणे सुरु होतं. बाजारपेठांमध्ये लगबग सुरु होती, मात्र त्यानंतर सायंकाळी 6.45 वाजता मणिनगर येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक स्फोट झाला. त्यानंतर 70 मिनिटांतच संपूर्ण अहमदाबाद हादरलं. अहमदाबादमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 बॉम्बस्फोट झाले होते.
सरकारी आकडेवारीनुसार, या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांनी आपला जीव गमवावा लागला होता आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. 2002 मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीननं हे स्फोट घडवून आणले होते. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ होता. मणिनगरमधून दोन जिवंत बॉम्ब पोलिसांनी जप्त केले होते. तर मणिनगरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाले होते.
13 वर्ष सुरु होती सुनावणी
8 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 13 वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती.
2008 अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण : दोषींच्या नावांची यादी
- जाहिद शेख
- इमरान शेख
- इकबाल शेख
- समसुद्दीन शेख
- जावेद शेख
- आसिफ शेख
- अतीक खिलजी
- मेहदी अंसारी
- सफीक अंसारी
- रफीउद्दीन
- आरिफ मिर्जा
- कबूमुद्दीन
- सिबिल मुस्लिम
- सफदर नागोरी
- हाफिज मुल्ला
- साजिद मंसूरी
- अफजल उस्मानी
- सर्फुद्दीन इत्ती
- मोहम्मद सादिक शेख
- अकबर चौधरी
- फजल दुर्रानी
- नौसाद सैयद
अहमद बरेलवी - रफीक अफीदी
- अमीन शेख
- मोहम्मद मोबिन खान
- मोहम्मद अंसार
- ग्यासुद्दीन अंसारी
- आरिफ कागजी
- उस्मान
- युनूस मंसरी
- इमरान पठान
- अबूबसर शेख
- अब्बास समेजा
- सैफू अंसारी
- मोहम्मद सैफ शेख
- जीशान शेख
- जिया-उर-रहमान
- तनवीर पठान
- अबरार मनियार
- शादुली करीब
- तौसीफ पठान
- मोहम्मद अली अंसारी
- मोहम्मद इस्माइल
- कमरुद्दीन
- अलीम काजी
- अनीक सैयद
- मोहम्मद शकील
70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये 'तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा." असं लिहिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना फाशी, 13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल
- Ahmedabad Serial Blast : ऐतिहासिक निकाल! 49 पैकी 38 दोषींना फाशी; 13 वर्ष सुरु असलेला खटला निकाली, नेमकं काय घडलं होतं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha