2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना फाशी, 13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल
2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात 49 आरोपींना दोषी ठरवलं असून त्यापैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 26 जुलै 2008 साली अहमदाबादमध्ये तासाभरात 21 बॉम्बस्फोट झालं होतं. या प्रकरणात 13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 49 जण दोषी
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरातमधील विशेष न्यायालयाने निकाल देताना 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवले आहे. तर 28 जणांना निर्दोष घोषित केले आहे.
20 वेगवेगळ्या ठिकाणी झाले बॉम्बस्फोट
याप्रकरणी अहमदाबादमध्ये 19 आणि कलोलमध्ये एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादीच्या न्यायालयात सादरीकरणाच्या भागामध्ये आरोपींविरुद्ध बॉम्ब बनवण्याचे पुरेसे पुरावे असल्याचे सांगण्यात आले. ज्या वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते, ती वाहने आरोपींनी नेल्याचे पुरेसे पुरावे सापडले. गुन्हेगारांविरुद्ध गुन्हेगारी कट, देशद्रोह आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचेही पुरावे आहेत. राज्यातील शांतता बिघडवणे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे यासाठी आरोपींविरुद्ध पुरावेही सापडले.
70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये 'तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा." असं लिहिलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha