एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ahmedabad Serial Blast : ऐतिहासिक निकाल! 49 पैकी 38 दोषींना फाशी; 13 वर्ष सुरु असलेला खटला निकाली, नेमकं काय घडलं होतं?

Ahmedabad Serial Blast Verdict : ऐतिहासिक निकाल! 49 पैकी 38 दोषींना फाशी; 11 जणांना जन्मठेप, 13 वर्ष सुरु असलेला खटला अखेर निकाली

Ahmedabad Serial Blast Verdict : गुजरातमधील अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयानं 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयानं 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली असून उर्वरित 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

दोषींना शिक्षा ठोठावण्याबरोबरच पीडितांना भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

13 वर्ष सुरु होती सुनावणी 

8 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर 28 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 13 वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात 78 आरोपी होते. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. त्यामुळे एकूण 77 आरोपी होते. तब्बल 13 वर्ष चाललेल्या खटल्यात 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी 6 हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते. 

अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6,752 पानांच्या निकालात 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर पुराव्याअभावी 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी 49 आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना आयपीसी कलम 302 (हत्या) आणि UAPA अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट 

26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये 'तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा."  असं लिहिलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2008 Serial Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 38 दोषींना फाशी, 13 वर्षांनी न्यायालयाचा निकाल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget