UGC कडून चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम तर पीएचडी अभ्यासक्रमातही सुधारणा होणार
उच्च शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूजीसी चार वर्षाचा नवा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार असून पीएचडी अभ्यासक्रमात सुद्धा सुधारणा करणार आहे.

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग चार वर्षाचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु करणार असून पीएचडी नियमांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या सुधारणा करणार आहेत. 10 मार्च रोजी यूजीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली. यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम (FYUP) पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला आहे.
पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षाचा असेल, जर तुम्ही चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला तर FYUP पात्रताधारक विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा थेट पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील.
हा नवा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना मल्टी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल आणि पुढे हा अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो
या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सेमिस्टर एक ते तीन हे शिक्षणाच्या सर्व प्रमुख क्षेत्रांची समज विकसित करण्यासाठी असतील. सेमिस्टरमध्ये चार ते सहा विद्यार्थी स्पेशलायझेशनसाठी किंवा आंतरविद्याशाखीय क्षेत्र निवडण्यासाठी आहेत. अंतिम दोन सत्रांमध्ये विद्यार्थी संशोधन प्रकल्प हाती घेतील.
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना...
- अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर एक वर्ष म्हणजेच 2 सेमिस्टर विद्यार्थ्याने पूर्ण केल्यास त्याला निवडलेल्या अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र दिले जाईल
- या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वर्ष म्हणजे 4 सेमिस्टर पूर्ण केल्यास विद्यार्थ्याचा डिप्लोमा पूर्ण होईल
- या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना तीन वर्ष म्हणजे सहा सेमिस्टर्स पूर्ण केल्यास त्याला बॅचलर डिग्री मिळेल. हा विद्यार्थी आधी प्रमाणेच दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल
- अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने पूर्ण चार वर्ष आठ सेमिस्टर पूर्ण केल्यास त्याला चार वर्षाची बॅचलर डिग्री मिळणार असून हा विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल
पीएचडी अभ्यासक्रमात नेमक्या काय सुधारणा आहेत?
- पीएचडी कमाल कालावधी सहा वर्षे निर्धारित केला आहे. शैक्षणिक वर्षाच्या एकूण रिक्त जागांपैकी साठ टक्के जागा NET/JRF पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील आणि उर्वरित 40 टक्के जागा मुलाखतीच्या आधारे विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेच्या पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील.
- आता या सगळ्या ड्राफ्ट नंतर UGC या सगळ्यावर सूचना आणि अभिप्राय पब्लिक डोमेनमधून मागण्याची शक्यता आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
