Hingoli News : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून जावयाने केला सासूचा खून; हिंगोलीतील घटना
Hingoli News : या प्रकरणी जावयाच्या विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे .

Hingoli News : हिंगोलीच्या जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, जावयाने आपल्याच सासूची हत्या केली आहे. वसमत शहरातील झेंडा चौक भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नाही या कारणावरून जावई आणि सासूचे भांडण झाले. रागाच्या भरात जावयाने 75 वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केले. यता सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. शेवंताबाई होणाजी वंजे असे मृत महिलेचे नाव असून, बाळासाहेब शिनगारे असे आरोपी जावयाचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून आरोपी बाळासाहेब शिनगारे याचे आणि त्यांची सासू या दोघांचे पहाटे 4 वाजेच्या सुमारास वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. दरम्यान यावेळी जावाई बाळासाहेब याने थेट सासूला मारहाण केली. तर याचवेळी सासूच डोकं दगडावर आपटले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तर आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीची पतीकडून गळा आवळून हत्या...
दुसऱ्या एका घटनेत शाब्दिक वादातून मारहाण करीत पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वसमत तालुक्यातील डिग्रस कन्हाळे येथे 6 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. योगिता संतोष कन्हाळे (वय 28 वर्षे) असे मयत महिलेचं नाव असून, संतोष बळीराम कन्हाळे असे आरोपी पतीचे नाव आहे.
वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगीता यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कन्हाळे येथील संतोष बळीराम कन्हाळे याच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ वाद होत होता. दरम्यान 6 मे रोजी संतोष कन्हाळे याची आई दोन्ही लहान मुलांसह नातेवाईकांकडे लग्नाला गेल्या होत्या. तसेच वडील शेतात गेले होते. दरम्यान त्या दिवशी रात्री संतोष व पत्नी योगिता यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी संतोषने योगीताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने योगीता जमिनीवर कोसळली. त्यानंतर संतोषने तिचा गळा आवळून खून केला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर विधवेशी शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत; पोलिसात गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
