एक्स्प्लोर

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल गोपीनाथ गडावरून केलेल्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं आहे. खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे आरोप खडसे यांनी गोपीनाथगडावरुन केले होते. नाथाभाऊ अनेकदा असं बोलतात ते त्यांच्या मनात नसतं पण ते बोलून जातात. मात्र यामुळं त्यांचं नुकसान होतं, असंही फडणवीस म्हणाले. खदखद योग्य ठिकाणी मांडायला हवी. खडसे यांच्या मुलीला तिकीट दिलंच की. त्यांना तिकिट न देण्याचा केंद्राचा निर्णय होता. राज्यातून नव्हता, असेही ते म्हणाले. त्यांनी अशाप्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. मंचही योग्य नव्हता. तो जयंतीचा कार्यक्रम होता, असंही फडणवीस म्हणाले. खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत केलेल्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक झालं नाही असा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपात काही तथ्य नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं डिझाईन तयार होण्यात काहीसा वेळ गेला. ते झाल्यानंतर त्या स्मारकाला सिडकोतून निधी देण्यात आला आणि त्याचे वर्क ऑर्डरही आली. खडसे यांनी उद्धवजींकडे पैसे मागण्याची गरज नाही, त्यांनी स्थगिती दिली असेल तर वेगळी गोष्ट आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भाजपा सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या चांगल्या स्मारकासाठी 46 कोटींचा निधी मंजूर केला. त्याच्या कामाची सुरुवात होते आहे. एवढंच नाही तर चार महिन्यांपूर्वीच LOA मान्य झाला होता. आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काम थांबलं. लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मारकाचं टेंडर निघालं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हे ही वाचा - शिवसेनेने महायुतीला मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केला; फडणवीसांचा आरोप यावेळी फडणवीस यांनी भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल असं देखील म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजपाच्या सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजपाच्याच सरकारमध्ये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. एवढंच नाही तर भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. हे देखील वाचाDevendra Fadnavis Exclusive | आमच्यासोबत येण्याआधी अजित पवार शरद पवारांशी बोलले होते : देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज आहेत याबाबत त्यांना विचारलं असता, फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो. माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहे. आजही आहे, उद्याही राहील, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा पराभव झालेला नाही. आम्ही उलट कमी जागा लढवून जास्त जागा जिंकलो. हे खरं आहे की आम्हाला जास्त जागा येतील अशी अपेक्षा होतील. आम्हाला 130 जागा येतील असं वाटलेलं. महायुतीला म्हणून लोकांनी बहुमत दिलं आहे, दोघांच्या जागा बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही, असेही ते म्हणाले. मी पुन्हा येईन हा शब्द आम्ही म्हणूनच आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलंThackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
Embed widget