Share Market : शेअर बाजारात अस्थिरता कायम, Sensex आणि Nifty मध्ये काही अंकांची घसरण
Share Market : मेटल कंपन्यांना मोठा फटका बसला असून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मुंबई: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात काहीशी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात झाली त्यावेळी सेन्सेक्स वधारला, पण बाजार बंद होताना त्यामध्ये पुन्हा घसरण झाली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 37 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 51 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.07 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,288 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.32 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,214 वर पोहोचला आहे.
आज 1390 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1932 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 158 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, कॅपिटल गुड्स, आणि आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.51 टक्क्यांची वाढ झाली. तर मेटल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर रिअॅलिटी, फार्मा, ऑईल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी घसरण झाली आहे.
सोमवारी शेअर बाजारात M&M, Maruti Suzuki, HUL, Asian Paints and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली असून JSW Steel, Tata Steel, Divis Labs, ONGC आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- M&M- 4.22 टक्के
- Maruti Suzuki- 4.10 टक्के
- HUL- 2.32 टक्के
- Larsen- 2.11 टक्के
- Asian Paints- 2.07 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- JSW Steel- 13.24 टक्के
- Tata Steel- 12.61 टक्के
- Divis Labs- 9.45 टक्के
- ONGC- 4.20 टक्के
- Hindalco- 3.72 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकानी वधारला. तर, निफ्टीमध्ये 55 अंकाची तेजी दिसून आली आहे. मात्र, थोड्याच वेळात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. त्यानंतर काही वेळेतच बाजार पुन्हा सावरल्याचे चित्र आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकात 41.72 अंकाची घसरण झाली होती. सेन्सेक्स 54,282.92 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 15 अंकाची घसरण झाली असून 16249.95 अंकावर व्यवहार करत होता.























