Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला अन् संजू, बुमराहबद्दल कर्णधार सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं, कुणाला दिले विजयाचे श्रेय? थेट बोलला
Suryakumar Yadav Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले.

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : भारताने पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटच्या जगात आपला दबदबा सिद्ध केला आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) तब्बल 96 धावांनी पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयासह भारत सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा इतिहासातील पहिलाच संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दमदार खेळ करत मोठा धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसनने शानदार 89 धावांची खेळी करत संघाला सुरुवात करून दिली. त्याला अभिषेक शर्माने 52 धावांची आणि ईशान किशनने 54 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. या तिघांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे केले. तर भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
2024 🏆
— BCCI (@BCCI) March 8, 2026
2026 🏆
First team to successfully defend an ICC Men's T20 World Cup title ✅
The reign continues for #TeamIndia 👑#T20WorldCup | #MenInBlue | #Final pic.twitter.com/gmIr5we67Q
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्या तो म्हणाला की, “मला वाटतं हे पूर्णपणे मनात बसायला अजून थोडा वेळ लागेल, पण आज जे घडलं त्याबद्दल आनंद आहे. हा प्रवास खूप मोठा होता. 2024 च्या वर्ल्ड कपनंतर हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी बीसीसीआयने, जय शाह भाई, त्यावेळचे सचिव, रोहित शर्मा भाई आणि इतर सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या शानदार संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतर हा प्रवास करत आम्ही पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलो आणि इथे हा किताब जिंकला. ही भावना खूप खास आहे.
The smiles say it all 😌
— BCCI (@BCCI) March 8, 2026
Vibe of champions 😎#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final pic.twitter.com/F65Rn4Fi1E
फेव्हरेट असण्याचा दबाव कसा दूर ठेवला?
पुढे तो म्हणाला की, आम्हाला माहित होतं की गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने चांगला क्रिकेट खेळत होतो. सगळं योग्य दिशेने चाललं होतं. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ज्या चांगल्या सवयी आम्ही लावल्या होत्या, त्याच पुढेही कायम ठेवायच्या होत्या. मी पोरांना नेहमी सांगत होतो की वर्ल्ड कप जिंकण्याची भावना काय असते, द्विपक्षीय मालिकांमध्ये आपण कसं खेळायचं, आणि त्या विजयाची चव पुढेही कशी कायम ठेवायची. संघातील प्रत्येकाने ती गोष्ट मनापासून स्वीकारली आणि मुलांनी त्यावर उत्तम प्रतिसाद दिला.
खेळाडूंवर विश्वास ठेवण्याबाबत काय म्हणाला सूर्या?
सूर्यकुमार यादव म्हणाला की, खेळाडू काय करू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. संजू, अभिषेक आणि वरुण यांच्यात सामना जिंकून देण्याची क्षमता आहे, हे मला ठाऊक होतं. संजूसाठी संघात येण्याची ही योग्य वेळ होती. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा हे जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू आहेत. त्यांच्यात काहीतरी खास आहे, हे आम्हाला नेहमीच माहिती होतं. आणि फायनलसारख्या मोठ्या मंचापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी यापेक्षा मोठी संधी नसते. तसंच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल हे खेळाडू खूप वर्षांपासून संघात आहेत. सपोर्ट स्टाफसह ते सगळे एकमेकांची काळजी घेत आले आहेत. त्यामुळे हा विजय खूप खास आहे.
बुमराहबद्दल सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav on Jasprit Bumrah)
संघात बुमराह असण्याबद्दल सूर्यकुमार यादव म्हणाला, मी आधीही सांगितलं आहे, जसं संजूने मागच्या सामन्यानंतर सांगितलं होतं की त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार तो जसप्रीत बुमराहला द्यायला तयार आहे. बुमराह हा ‘एक पिढीत एकदाच जन्माला येणारा’ गोलंदाज आहे. सध्या तर मी त्याला देशाची अमूल्य संपत्ती म्हणेन. त्याला नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे चांगलं माहिती आहे. तो या खेळात सर्वोत्तम आहे आणि आशा आहे की तो असाच पुढेही संघासाठी चमकदार कामगिरी करत राहील. धन्यवाद, अहमदाबाद.”
हे ही वाचा -




















