एक्स्प्लोर

Delhi Crime : संतापजनक! दिल्लीतील खाजगी निवारागृहात अल्पवयीन मुलावर बलात्कार

दिल्लीत एका खासगी निवारागृहात राहणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे.

Boy Sexually Assaulted In Delhi : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषणाच्या घटना समोर येत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अशा घटनेचे शिकार झाल्याचे अनेकदा बातमीतून समोर आले आहे. दिल्लीतून अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी निवारागृहात राहणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल रात्री आमच्या 181 हेल्पलाइनवर कॉल आला आणि सांगितले की दिल्लीतील एका खाजगी निवारागृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे तिथल्या दुसऱ्या मुलाने लैंगिक शोषण केले आहे. आम्ही लगेच पोलिसांना कळवले आणि मुलाची भेट घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. DCW चे अध्यक्षा पुढे म्हणाल्या की, आम्ही दिल्ली पोलिसांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी नोटीसही बजावली आहे.

गेल्या महिन्यात 31 ऑगस्ट रोजी  वॉशरूममध्ये जात असताना ही घटना घडली होती. त्यानंतर त्याच निवारागृहात राहणारा मुलगा आला आणि संबंधित मुुलावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत अल्पवयीन मुलाने निवारागृहाच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली मात्र त्यांनी आरोपी मुलावर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर मुलाने दिल्ली महिला आयोगाशी संपर्क साधला. आईच्या मृत्युनंतर आणि वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर पीडित मुलगा पाच वर्षांपूर्वी निवारागृहात आला होता. 

दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार

दोन दिवसांपूर्वी 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले आहेत. एवढेच नाही तर त्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने सांगितले की, झोपडपट्टीत एकटी राहणाऱ्या 85 वर्षीय पीडितेने असा आरोप केला आहे की, पहाटे 4 वाजता एका व्यक्तीने तिच्या झोपडपट्टीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांना पाठवलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, "या महिलेने असेही म्हटले आहे की, आरोपीने तिला सुरूवातीस मारहाण केली, नंतर ब्लेडने तिचे ओठ कापले आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला." तसेच त्या वृद्ध महिलेच्या संपूर्ण शरीरावर आणि गुप्तांगावरही जखमा आढळून आले असल्याचे महिला आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जालन्यातील लाठीमारप्रकरणी फडणवीसांनी मागितली माफी तर राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी, शिंदेंची ग्वाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Bihar Election : बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला धक्का, हेमंत सोरेन यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरले, पार्टीच्या सचिवांची माहिती
बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्र लढणार, काँग्रेस-राजदला धक्का, मतदारसंघ ठरले
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Modern College: कॉलेजकडून आडकाठी, इंग्लंडमधील नोकरी गेली, काय आहे प्रकरण?
Voter List : मतदार याद्यांमध्ये घोळ? सत्ताधारीच आक्रमक, 48 तासांत दुबार नावं हटतील
Election Vote List Scam : आरोपांच्या फैरी चौकशीची तयारी, मतदार यादीत घोळ?
Maharashtra Politics: दोन ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडणार, ठाण्यात ठाकरे बंधूंचा झेंडा फडकणार?
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
...म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई; शेअर मार्केटमधू ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक
Bihar Election : बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला धक्का, हेमंत सोरेन यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरले, पार्टीच्या सचिवांची माहिती
बिहारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्र लढणार, काँग्रेस-राजदला धक्का, मतदारसंघ ठरले
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
जालन्यातील लाचखोर आयुक्तास कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
दिवाळीला कार घेताय, मग 15 लाखांपेक्षा कमी किंमतीवल्या ADAS कार, फिचर्स दमदार; टाटा Nexon ते महिंद्रा XUV
दिवाळीला कार घेताय, मग 15 लाखांपेक्षा कमी किंमतीवल्या ADAS कार, फिचर्स दमदार; टाटा Nexon ते महिंद्रा XUV
Bihar Election :  एनडीएला मोठा धक्का, सिने क्षेत्रातून राजकारणात आलेल्या अभिनेत्रीचा अर्ज रद्द, चिराग पासवान यांनी पहिली जागा गमावली, राजदसाठी गुड न्यूज
बिहार विधानसभेची एक जागा एनडीएनं मतदानापूर्वीच गमावली, चिराग पासवान यांच्या पक्षाच्या सीमा सिंह यांचा अर्ज बाद
Share Market :  शेअर बाजार सलग चार दिवस बंद राहणार, कोणत्या दिवशी सुट्टी आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय? जाणून घ्या
शेअर बाजार सलग चार दिवस बंद राहणार, मुहूर्त ट्रेडिंग कोणत्या दिवशी होणार? जाणून घ्या बदललेली वेळ
Satej Patil on Election Commission: किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
Embed widget