एक्स्प्लोर
Goregaon fire :गोरेगावमध्ये 31 मजली टॉवरला भीषण आग, दोन जण गंभीररित्या भाजले
Goregaon fire : गोरेगावमधील एका 31 मजली टॉवरला भीषण आग लागली आहे, यामध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Photo Credit - abp majha reporter
1/10

गोरेगावच्या सिद्धार्थ नगर परिसरात 31 मजली टॉवरला आग लागली आहे.
2/10

कल्पतरू रेसिडेन्सीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी 1 वाजता ही मोठी आग लागली.
3/10

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 4 ते 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.
4/10

गेल्या एक ते दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
5/10

या आगीत दोन जण जळून गंभीर जखमी झाले आहेत.
6/10

त्यांच्यावर जवळचा ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
7/10

मनोज चव्हाण वय 30 वर्ष आणि सहाबुद्दीन वय 50 असं जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
8/10

सध्या अग्निशमन दलाचा जवानांकडून फायर कुलिंगचे काम सुरू आहे.
9/10

वायरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
10/10

पोलिस आणि अग्निशमन दलाचा जवानांकडून या आगी संदर्भात अधिक तपास केला जात आहे.
Published at : 02 Nov 2024 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
