(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Rape Case : संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार, गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न
दिल्लीत 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले आहेत.
Delhi News : आजकाल बलात्काराच्या (Rape) घटना सतत घडताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीतून (Delhi) समोर आली आहे. दिल्लीत 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले आहेत. एवढेच नाही तर त्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने सांगितले की, झोपडपट्टीत एकटी राहणाऱ्या 85 वर्षीय पीडितेने असा आरोप केला आहे की, पहाटे 4 वाजता एका व्यक्तीने तिच्या झोपडपट्टीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांना पाठवलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, "या महिलेने असेही म्हटले आहे की, आरोपीने तिला सुरूवातीस मारहाण केली, नंतर ब्लेडने तिचे ओठ कापले आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला." तसेच त्या वृद्ध महिलेच्या संपूर्ण शरीरावर आणि गुप्तांगावरही जखमा आढळून आले असल्याचे महिला आयोगाकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
ही घटना दिल्लीतील शकूरपुर या भागात बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली आहे. कलम 376 (बलात्कार) अंतर्गत सुभाष प्लेस पोलिस ठाण्यात आरोपीवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अजून तपासणी दिल्ली पोलिस करत आहेत. तसेच ही घटना घडली त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची प्रत आणि जिल्ह्यात एकटे राहणाऱ्या सर्व वृद्धांची यादी पोलिसांकडे आहे का, याची माहिती आयोगाने मागवली आहे.
दिल्ली महिला आयोगाने पीडित वृद्ध महिलेची भेट घेतली
या घटनेची माहिती समोर येताच दिल्ली महिला आयोगाने पीडित वृद्ध महिलेची तात्काळ भेट घेतली. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर (Social Media) ट्विट केले आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की, "दिल्लीत मानवतेचा ऱ्हास झाला आहे. त्या वृद्ध महिलेची अवस्था पाहून मला मोठा धक्का बसला."
इतर महत्वाच्या बातम्या