Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Santosh Deshmukh Death: रामदास आठवले म्हणतात, सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हार्टअटॅकने नव्हे तर पोलिसांच्या मारहाणीमुळे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रामदास आठवलेंची टिप्पणी, म्हणाले...
परभणी: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणासाठी धनंजय मुंडे यांचा सरळ संबंध नाही, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य रिपाई प्रमुख आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी केले. मात्र, रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) पोलीस आणि सीआयडीच्या तपासाविषयी (CID Probe) काहीशी नाराजी व्यक्त केली. मी बीड (Beed news) जिल्ह्यात जाऊन आलो. संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. मस्साजोग प्रकरणात अद्याप घरच्यांचा जबाब घेतला नाही, सीआयडीने लवकर त्यांचा जबाब नोंदवावा, असे रामदास आठवले यांनी म्हटले. ते सोमवारी परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास गृहविभागासोबत पोलिसांची जबाबदारी आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. मी याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणार आहे. आम्ही याप्रकरणाचा पाठपुरावा नक्की करु. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सरळ संबंध नाही, असे मला वाटते. पण दोषींवर कारवाई झाली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येमगील सूत्राधार कोण आहे, हे मला माहिती नाही. पण माझ्याकडे तपास दिल्यास मी मास्टरमाईंड कोण आहे, हे सांगू शकतो, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हार्टअटॅकने नव्हे तर पोलिसांच्या मारहाणीमुळे: रामदास आठवले
रामदास आठवले यांनी सोमवारी परभणी हिंसाचारात (Parbhani Violence) मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) लातूर जिल्ह्याचा रहिवाशी होता. परभणीत लॉ चा विद्यार्थी होता, आंदोलनात त्याचा काही संबंध नव्हता. तो फोटो काढत होता. पोलिसांनी सांगितले की, सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती, त्यानंतर युवकांमध्ये संताप होता, त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. लॉकअपमध्ये मारहाण झाली, त्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असे आमचे म्हणणे आहे. मदतसाठी मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. पोलिसांनी अन्याय करणे बरोबर नाही. संविधानच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा मनोरुग्ण नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले.
आणखी वाचा
संतोष देशमुखांचा भाऊ पोलिसांच्या भेटीला, CID अधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले....