Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सीआयडीकडून कसून चौकशी सुरु आहे.
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याप्रकरणी सीआयडीकडून कसून चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार फरार आरोपींची खाती गोठवण्यासाठी सीआयडीने 13 बँकांना पत्र दिले. मालमत्ता जप्तीच्या संदर्भात सीआयडीने ही कार्यवाही पूर्ण केली आहे. तर सोबतच वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्याशी संबंधित महिलेची आजही सीआयडी पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी; धनंजय देशमुखांचा दावा
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली. तर सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरु आहे. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय. वाल्मिक कराड सुरूवातीच्या दिवसात या महिलेकडे राहायला होते अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आलेय. तर हत्या करणाऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणीही धनंजय देशमुखंनी केली आहे.
सरपंच संघटनांनी पुकारलं काम बंद आंदोलन-
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरातील सरपंच संघटनांनी ग्रामपंचायतचं काम बंद आंदोलन पुकारलं आहे. सरपंच संघटनेच्यावतीने ग्रामपंचायतीसमोर काळ्याफिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. या कामबंद आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक ग्रामपंचायत सहभागी होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत चार आरोपींना अटक-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या.
अटकेतील आरोपी
1. जयराम चाटे (हत्या प्रकरण)
2. महेश केदार (हत्या प्रकरण)
3. प्रतीक घुले (हत्या प्रकरण)
4. विष्णू चाटे (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
फरार आरोपी
5. सुदर्शन घुले (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
6. कृष्णा आंधळे (हत्या प्रकरण)
7. सुधीर सांगळे (हत्या प्रकरण)
8. वाल्मिक कराड (खंडणी प्रकरण)
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीची चौकशी? धनंजय देशमुख यांचा दावा काय?, VIDEO:
संबंधित बातमी:
मारहाणीचे चार व्हिडीओ हाती, राजकीय नेत्यांना कॉल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती