एक्स्प्लोर

ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचा बहुमान, ब्रिटनच्या महाराणीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती

बॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला.

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने 13 जानेवारी रोजीच नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्धीस दिली असून, त्यामध्ये साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे. साळवे यांनी केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती. बॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत. कोण आहेत हरीश साळवे? हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. * 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली * 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं * हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली. * कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. * टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती. * भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली * इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती. * सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली. साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती. - 2009 साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला. - 2011 मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला. - हरीश साऴवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे. * साळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे. * त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे. * ब्रिटीश हँडमेड फोन व्हर्च्यु आणि महागड्या घड्याळ्यांचे साळवे शौकीन आहेत. * साळवे हे केस फक्त एकदाच ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा ते वादी किंवा प्रतिवादीला भेटत नाहीत. * साळवे यांच्या ताफ्यात बेन्ट्लीसारखी गाडी आहे. तर त्यांचं गोव्यात हॉलिडे होम आहे. * आपल्या कपडे खरेदीसाठी साळवे हे थेट लंडनला जातात. Queen's Counsel महाराणीचे सल्लागार एकूण 114 बॅरिस्टर्स आणि कायदेतज्ञांची QC - राणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती. यांना सिल्क म्हणूनही ओळखतात. 114 पैकी 30 महिला, 22 बिगर ब्रिटन वंशांचे, 26 सल्लागार 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, 4 सॉलिसिटर अॅडव्होकेट (कायदेपंडित) या पदासाठी जवळपास 258 अर्ज आले होते, त्यातील 114 जणांची नियुक्ती झाली, असं न्याय विभागाने सांगितलं आहे. 16 मार्च रोजी शाही समारंभात या 114 जणांची राणीच्या उपस्थितीत औपचारिक नियुक्ती केली जाईल. संबंधित बातम्या  सुषमा स्वराज यांनी एक रुपया फी घेण्यासाठी बोलावलं होतं : हरीश साळवे  केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू मांडणारे बॅ. हरीश साळवे  तो पाकिस्तानी वकील, जो हरीश साळवेंसमोर टिकलाच नाही! कुलभूषण जाधवांसाठी बॅ. हरीश साळवेंची सातासमुद्रापार यशस्वी लढाई! कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूनMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget