एक्स्प्लोर

केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू मांडणारे बॅ. हरीश साळवे

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताच्या बाजूने कुलभूषण जाधव यांची केस लढवणाऱ्या बॅरिस्टर हरीश साळवे यांनी खिंड लढवली. केवळ एक रुपये फी घेऊन साळवेंनी भारताला विजयाच्या दिशेने नेलं.

मुंबई : भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जातो. भारताच्या बाजूने बॅरिस्टर हरीश साळवे यांनी खिंड लढवली. विशेष म्हणजे केवळ एक रुपये फी घेऊन साळवेंनी भारताला विजयाच्या दिशेने नेलं. नेदरलॅण्ड्सच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15-1 मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. कोण आहेत बॅरिस्टर हरीश साळवे? हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. वकिलीचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. * 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली * 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं * हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली. * कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. * टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती. * भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली * इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती. * सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली. साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती. - 2009 साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला. - 2011 मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला. - हरीश साळवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे. कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत. * साळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे. * साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे. * ब्रिटीश हँडमेड फोन व्हर्च्यु आणि महागड्या घड्याळांचे साळवे शौकीन आहेत. * साळवे हे केस फक्त एकदाच ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा ते वादी किंवा प्रतिवादीला भेटत नाहीत. * साळवे यांच्या ताफ्यात बेन्ट्लीसारखी गाडी आहे. तर त्यांचं गोव्यात हॉलिडे होम आहे. * आपल्या कपडे खरेदीसाठी साळवे हे थेट लंडनला जातात. काहीही असो, पण साळवे यांच्या कर्तृत्वाला कुणीच नाकारु शकणार नाही, आताही एका मराठी माणसाच्या सुटकेसाठी एक मराठी माणूस सातासमुद्रापार लढतोय, हीच मोठी गोष्ट आहे. दुसरीकडे, कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने एक-दोन नव्हे, तर तब्बल वीस कोटी रुपये खर्च केले. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या खावर कुरेशी यांनी पाकिस्तानची बाजू मांडली कोण आहेत खवर कुरेशी? आंतरराष्ट्रीय कोर्टात खवर कुरेशी हे भारताविरुद्ध पहिलीच केस लढत होते असं नाही. यापूर्वी 2016 मध्येही त्यांनी पाकिस्तानकडून युक्तीवाद केला होता. हा खटला हैदराबादचे सातवे निजाम उस्मान अली खानच्या जवळपास 250 कोटी रुपयांच्या फंडाचा होता. या फंडावर निजामांच्या वंशजांसह भारत आणि पाकिस्तान अशा तिघांचाही दावा होता. भारत आणि निजामांच्या वंशजांविरोधात लढून, खवर कुरेशींनी पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू मांडणारे बॅ. हरीश साळवे पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश नागरिक खवर कुरेशी हे सेरले कोर्ट नावाच्या एका खासगी लॉ फर्मशी संबंधित आहेत. ते पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. त्यांनी 2006 मध्ये क्वीन्स कौन्सिल बनवण्यात आलं होतं. इंग्लंडमध्ये काही खास आणि मोठ्या वकिलांनाच क्वीन्स कौन्सिल बनवण्यात येतं. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्सच्या कोर्टात वकिली करण्याचा अधिकार मिळतो. खवर कुरेशी आणि ICJ अर्थात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजेच आंतरराष्ट्रीय कोर्टाचं जुनं नातं आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात 1993 मध्ये वकिली करणारे खवर कुरेशी हे सर्वात कमी वयाचे वकील होते. त्यावेळी खवर यांनी बोस्नियाचे वकील म्हणून युगोस्लावियाविरोधात नरसंहार प्रकरणात खटला लढला होता. खवर हे आंतरराष्ट्रीय खटल्यात नावाजलेले आणि निष्णात वकील म्हणून ओळखले जातात. खवर कुरेशी यांचे विक्रम खवर कुरेशी यांनी इंग्लंडमध्ये सर्व स्तरावरील कोर्टात वकिली केली आहे. सेरले कोर्टच्या वेबसाईटनुसार, खवर कुरेशी यांनी 60 देशांविरोधात खटले लढले आहेत. 1999-2006 या काळात ते यूके सरकारच्या 'ए' पॅनेल ट्रेजरी कौन्सिलचे वकील होते. हे कौन्सिल यूके सरकारला नागरी खटल्यात सल्ला देते. 1998-2008 या दरम्यान खवर कुरेशी हे पब्लिक इंटरनॅशनल लॉ कमेटीचे चेअरमन आणि बार कौन्सिल इंटरनॅशनल रिलेशन कमिटीचे उपाध्यक्ष होते. ब्रिटीश हायकोर्टाचे जज खवर कुरेशी 2008 मध्ये यूके बाहेर पहिल्यांदा बनलेल्या बॅरिस्टर्स चेंबर्सचे प्रमुख होते. हा चेंबर कतारमध्ये बनला होता. जानेवारी 2013 मध्ये त्यांची हायकोर्टाच्या उपन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. कोर्टात वकिलाती करण्यासोबतच खवर कुरेशी हे केंब्रीज विद्यापीठात गेस्ट लेक्चर म्हणूनही काम करतात. त्याशिवाय कायद्यासंबंधी त्यांनी लेखनही केलं आहे. जगभरातील वकिलांच्या चेंबर्स आणि वकिलांची रँक जाहीर करणाऱ्या 'चेंबर्स अँड पार्टनर्स'ने खवर कुरेशी यांच्याबाबत 2014 मध्ये लिहीलं होतं, "खवर हे जटील खटलेही चुटकीसरशी लढतात. आजच्या वकिलामध्ये जे गुण असणं आवश्यक आहे, ते सर्व खवर यांच्यात आहेत"
संबंधित बातम्या
पाकिस्तानात स्वत:च्या वकिलांची छी थू, अडाणीपणावर टीकास्त्र
कुलभूषण जाधवांसाठी बॅ. हरीश साळवेंची सातासमुद्रापार यशस्वी लढाई!
कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Satish Bhosale:खोक्या असो की बोक्या कुणालाही सोडणारनाही,मुख्यमंत्र्यांकडून शब्दSatish Bhosale Khokya Home News | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई,संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
Embed widget