एक्स्प्लोर

कुलभूषण जाधवांसाठी बॅ. हरीश साळवेंची सातासमुद्रापार यशस्वी लढाई!

मुंबई: 'अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.’ असा निकाल देत आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. आंतरराष्ट्रीय कोर्टानं सुनावलेल्या या निर्णयासाठी भारताचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद फार महत्वाचा ठरला. कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची  शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण देशातून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या या निकालानंतर भारतानं थेट आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताकडून बॅरिस्टर हरीश साळवे यांची निवड करण्यात आली. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात अतिशय समर्पक शब्दात पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला. याचवेळी पाकनं व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचंही त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाला पटवून दिलं. या संपू्र्ण युक्तीवादाचा आज परिणाम पाहायला मिळाला. हरीश साळवेंच्या याच युक्तीवादानंतर 'अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.' असं आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात हरीश साळवे यांनी बजावलेली भूमिका फार महत्वाची होती. त्यामुळे कुलभूषण जाधवांसाठी सातासमुद्रापार लढलेली लढाई एका मराठी माणसामुळे यशस्वी ठरली. असं म्हटल्यास वावगं ठरु नये. हरीश साळवे हे प्रत्येक खटल्यासाठी लाखो रुपये घेतात असा त्यांचा लौकीक आहे. पण या खटल्यामध्ये हरीश साळवे यांनी फक्त 1 रुपये फी घेतली. खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली. बॅरिस्टर हरीश साळवे यांची आजवरची कारकीर्द: बॅरिस्टर हरीश साळवे… आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. * 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली   * 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं   * हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली.   * कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती.   * टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती.   * भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली   * इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती.   * सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली.   साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती.   – 2009 साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला.   – 2011 मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला.   – हरीश साऴवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे. कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत. * साळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे.   * त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे.   * ब्रिटीश हँडमेड फोन व्हर्च्यु आणि महागड्या घड्याळ्यांचे साळवे शौकीन आहेत.   * साळवे हे केस फक्त एकदाच ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा ते वादी किंवा प्रतिवादीला भेटत नाहीत.   * साळवे यांच्या ताफ्यात बेन्ट्लीसारखी गाडी आहे. तर त्यांचं गोव्यात हॉलिडे होम आहे.   * आपल्या कपडे खरेदीसाठी साळवे हे थेट लंडनला जातात. काहीही असो, पण साळवे यांच्या कर्तृत्वाला कुणीच नाकारु शकणार नाही, एका मराठी माणसाच्या सुटकेसाठी एक मराठी माणूस सातासमुद्रापार यशस्वीपणे लढला... ही महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. संबंधित बातम्या: कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द! आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल: कुलभूषण जाधवांच्या घराबाहेर फटाके फोडून आंनद साजरा अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : कोर्ट कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला! आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget