एक्स्प्लोर

कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!

मुंबई: बॅरिस्टर हरीश साळवे… आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. * 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली * 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं * हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली. * कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. * टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती. * भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली * इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती. * सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली. साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती. - 2009 साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला. - 2011 मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला. - हरीश साऴवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे. कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे. साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत. * साळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे. * त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे. * ब्रिटीश हँडमेड फोन व्हर्च्यु आणि महागड्या घड्याळ्यांचे साळवे शौकीन आहेत. * साळवे हे केस फक्त एकदाच ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा ते वादी किंवा प्रतिवादीला भेटत नाहीत. * साळवे यांच्या ताफ्यात बेन्ट्लीसारखी गाडी आहे. तर त्यांचं गोव्यात हॉलिडे होम आहे. * आपल्या कपडे खरेदीसाठी साळवे हे थेट लंडनला जातात. काहीही असो, पण साळवे यांच्या कर्तृत्वाला कुणीच नाकारु शकणार नाही, आताही एका मराठी माणसाच्या सुटकेसाठी एक मराठी माणूस सातासमुद्रापार लढतोय. हीच मोठी गोष्ट आहे. संबंधित बातम्या : Live Update : कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणी सुरु

महत्त्वाच्या बातम्या

ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Embed widget