एक्स्प्लोर
तो पाकिस्तानी वकील, जो हरीश साळवेंसमोर टिकलाच नाही!
हेग (नेदरलँड): आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांची फाशी अंतिम निर्णयापर्यंत रोखली आहे.
आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव खटल्यात भारताकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली. यासाठी त्यांनी अवघी एक रुपये फी घेतली आहे.
कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!
दुसरीकडे पाकिस्तानकडून खवर कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्तीवाद केला. मात्र त्यांचा युक्तीवाद अमान्य करत, कोर्टाने कुलभूषण जाधव यांची फाशी रोखली. त्यामुळे खवर कुरेशी यांच्यावर पाकिस्तानातून टीका होत आहे.
कोर्टात 90 मिनिटांचा वेळ असताना, खवर कुरेशी केवळ 50 मिनिटेच युक्तीवाद करु शकले, त्यामुळेही ते टीकेचे धनी होत आहेत.
कोण आहेत खवर कुरेशी?
आंतरराष्ट्रीय कोर्टात खवर कुरेशी हे भारताविरुद्ध पहिलीच केस लढत होते असं नाही. यापूर्वी 2016 मध्येही त्यांनी पाकिस्तानकडून युक्तीवाद केला होता.
पाकिस्तानात स्वत:च्या वकिलांची छी थू, अडाणीपणावर टीकास्त्र
हा खटला हैदराबादचे सातवे निजाम उस्मान अली खानच्या जवळपास 250 कोटी रुपयांच्या फंडाचा होता. या फंडावर निजामांच्या वंशजांसह भारत आणि पाकिस्तान अशा तिघांचाही दावा होता.
भारत आणि निजामांच्या वंशजांविरोधात लढून, खवर कुरेशींनी पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश नागरिक
खवर कुरेशी हे सेरले कोर्ट नावाच्या एका खासगी लॉ फर्मशी संबंधित आहेत. ते पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. त्यांनी 2006 मध्ये क्वीन्स कौन्सिल बनवण्यात आलं होतं.
इंग्लंडमध्ये काही खास आणि मोठ्या वकिलांनाच क्वीन्स कौन्सिल बनवण्यात येतं. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्सच्या कोर्टात वकिली करण्याचा अधिकार मिळतो.
खवर कुरेशी आणि ICJ अर्थात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजेच आंतरराष्ट्रीय कोर्टाचं जुनं नातं आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात 1993 मध्ये वकिली करणारे खवर कुरेशी हे सर्वात कमी वयाचे वकील होते.
त्यावेळी खवर यांनी बोस्नियाचे वकील म्हणून युगोस्लावियाविरोधात नरसंहार प्रकरणात खटला लढला होता.
खवर हे आंतरराष्ट्रीय खटल्यात नावाजलेले आणि निष्णात वकील म्हणून ओळखले जातात.
खवर कुरेशी यांचे विक्रम
खवर कुरेशी यांनी इंग्लंडमध्ये सर्व स्तरावरील कोर्टात वकिली केली आहे. सेरले कोर्टच्या वेबसाईटनुसार, खवर कुरेशी यांनी 60 देशाविरोधात खटले लढले आहेत.
1999-2006 या काळात ते यूके सरकारच्या 'ए' पॅनेल ट्रेजरी कौन्सिलचे वकील होते. हे कौन्सिल यूके सरकारला नागरी खटल्यात सल्ला देते.
1998-2008 या दरम्यान खवर कुरेशी हे पब्लिक इंटरनॅशनल लॉ कमेटीचे चेअरमन आणि बार कौन्सिल इंटरनॅशनल रिलेशन कमिटीचे उपाध्यक्ष होते.
ब्रिटीश हायकोर्टाचे जज
खवर कुरेशी 2008 मध्ये यूके बाहेर पहिल्यांदा बनलेल्या बॅरिस्टर्स चेंबर्सचे प्रमुख होते. हा चेंबर कतारमध्ये बनला होता.
जानेवारी 2013 मध्ये त्यांची हायकोर्टाच्या उपन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली.
कोर्टात वकिलाती करण्यासोबतच खवर कुरेशी हे केंब्रीज विद्यापीठात गेस्ट लेक्चर म्हणूनही काम करतात. त्याशिवाय कायद्यासंबंधी त्यांनी लेखनही केलं आहे.
जगभरातील वकिलांच्या चेंबर्स आणि वकिलांची रँक जाहीर करणाऱ्या 'चेंबर्स अँड पार्टनर्स'ने खवर कुरेशी यांच्याबाबत 2014 मध्ये लिहीलं होतं, "खवर हे जटील खटलेही चुटकीसरशी लढतात. आजच्या वकिलामध्ये जे गुण असणं आवश्यक आहे, ते सर्व खवर यांच्यात आहेत"
संबंधित बातम्या
पाकिस्तानात स्वत:च्या वकिलांची छी थू, अडाणीपणावर टीकास्त्र
कुलभूषण जाधवांसाठी बॅ. हरीश साळवेंची सातासमुद्रापार यशस्वी लढाई!
कुलभूषण जाधवांची बाजू मांडणाऱ्या बॅ. हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!
'आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल मान्य नाही', पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement