एक्स्प्लोर

रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी

भंडाऱ्यातील अपघाताच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड करत महामार्गावर मृतदेह ठेवत चक्काजाम आंदोलन केलं.

गोंदिया : होळीच्या सणाला गालबोट लागणाऱ्या दोन घटना घडल्या असून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील या दोन विविध घटनांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तुमसर-भंडारा मार्गावरील खापा खरबी फाट्याजवळ एका भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत (Accident) 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia) सडक अर्जुनी तालुक्यात अंघोळीसाठी तलावात गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

भंडाऱ्यातील अपघाताच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड करत महामार्गावर मृतदेह ठेवत चक्काजाम आंदोलन केलं. तुमसरकडून भंडाऱ्याच्या दिशेनं आज दुपारी एक चारचाकी वाहन अतिवेगानं जात असताना, खापा खरबी गावाजवळ या कारनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार गोलू कांबळे (32) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील इतर दोन प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताचं परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, घटनेची माहिती देऊनही पोलीस प्रशासनाला पोहोचायला उशीर झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 

ग्रामस्थांकडून चक्का जाम

संतप्त जमावानं अपघातग्रस्त कारवर दगडफेक करत तिची तोडफोड केली, मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल 4 तास वाहतूक रोखून धरली होती. अखेर पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढली. मृताच्या कुटुंबीयांना योग्य मदतीचं आश्वासन दिल्यानंतर आणि प्रशासनानं तोडगा काढल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. तब्बल 4 तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सागर गहाणे (16), प्रणय गहाणे (13) अशी दोन्ही मृतकांची नावं आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र रंगपंचमी साजरी केली जाते. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथील काही मुलांनी रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.

हेही वाचा

PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget